Thief 
छत्रपती संभाजीनगर

बॅंक व्यवस्थापकाच्या पत्नीने लगोलग वीस हजार रुपये दिलेही, तरी त्याला....

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: मुंबईतील एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकाला बीड बायपासवर लुटल्याप्रकरणी आरोपी किशोर अंबादास पवार (२४, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता. नऊ) वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी सोमवारी (ता. आठ) दिले. आरोपीला ५ जून रोजी पोलिसांनी अटक केली होती. तर न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (ता. आठ) कोठडी सुनावली होती. 

मुंबईतील तुर्भे एमआयडीसी शाखेत व्यवस्थापक असलेले प्रशांत शिरभाते (३५, रा. नेरूळ, नवी मुंबई) हे २३ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास पत्नी प्राची व मुलगी श्रीजा असे तिघे कारने (एमएच-२७-बीव्ही-२५५५) नागपूरच्या दिशेने निघाले. रात्री पावणेअकराच्या सुमारास शिरभाते बीड बायपासवरून जात असताना तीन लुटारूंनी अचानक मारहाणीला सुरवात केली. या प्रकारामुळे शिरभाते यांच्या पत्नी प्राची प्रचंड घाबरून गेल्या.

त्यांनी लगेचच पर्समधील बारा हजार रुपयांची रोकड या लुटारूंना दिली. याचवेळी लुटारूंना प्राची यांच्या हातात चार ग्रॅमची अंगठी आणि पर्समध्ये चार तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या दिसल्यामुळे त्यांनी त्यादेखील बळजबरीने हिसकावून घेतल्या. त्यानंतर शिरभाते यांना कारची चावी दिली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील उद्धव वाघ यांनी कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT