14New_Year_Celebration 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये‘थर्टी फर्स्ट’साठी तगडा बंदोबस्त, कोरोना संसर्गाचे भान ठेवण्याचे आवाहन

मनोज साखरे

औरंगाबाद : नववर्षाच्या स्वागतासाठी यंदाच्या जल्लोषावर कोरोनाचे विरजण असले तरीही बंदोबस्तात मात्र तसूभरही कमतरता नसून तब्बल एक हजार पोलिसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी शहरात तैनात करण्यात आला आहे. नववर्षाचे स्वागत करतानाच कोरोना संसर्गाचे भान व शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी केले.
दरवर्षी नववर्षाचे स्वागत मोठ्या आनंदात केले जाते. अनेक हॉटेल्स व ढाब्यांसह विविध स्थळी पार्ट्या केल्या जातात. परंतू यंदाचे वर्ष सर्वांसाठी दुःखदायक ठरले. कोरोनामुळे अनेक बंधने आली. हीच बंधने व कोरोनाचे सावट नव्या वर्षात पदार्पण करतानाही सोबतीला आहेत. गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



असा आहे बंदोबस्त
- दोन पोलिस उपायुक्त, पाच सहायक आयुक्त
- २१ पोलिस निरीक्षक, १२९ सहायक व उपनिरीक्षक
- ७४४ पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर असतील.


मद्य पिऊन वाहन चालविणारे टार्गेट
फिक्स पॉईंट लावण्यात येणार असून दुचाकीवरूनही पोलिस गस्त घालतील. महिला छेडछाड विरोधी व ध्वनी प्रदूषण, पोस्टर-बॅनरविरोधी पथकही तैनात करण्यात येतील. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधातही मोठी कारवाई हाती घेण्यात आली आहे.


शासनाच्या आदेशानुसार सर्वांनी आपल्या घरी साधेपणाने व आनंदात नववर्षाचे स्वागत करावे. शासकीय वेळेनंतर नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये. साथरोग कायदा तसेच जमावबंदीचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करणार आहोत. ती वेळ कुणावर येऊ नये.
-निखील गुप्ता, पोलिस आयुक्त

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT