police police
छत्रपती संभाजीनगर

रमजान ईदला ‘खाकी’ने २२ कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलवले समाधान

महिला सहायता कक्षाच्या शेख यांनी केले २२ किराणा किटचे वाटप

सुषेन जाधव

औरंगाबाद: कोरोनामुळे कर्त्या पुरुषाच्या हाताला काम नाही, त्यात रमजानचा सण. त्यामुळे लेकरांना काय सांगणार, या विवंचनेतून काही महिलांनी पोलिस आयुक्त कार्यालयातील महिला सहायता कक्षाच्या समुपदेशक फहिमुन्नीसा शेख (Aurangabad police) यांना संपर्क केला अन् परिस्थिती सांगितली.

श्रीमती शेख यांनी स्वतः २२ किराणा किट खरेदी करून गंगापूर तालुक्यातील डोमेगावात वाटप केल्या. विशेष म्हणजे, श्रीमती शेख यांनाही रोजा (उपवास) होता; तसेच त्या कर्तव्यावरही होत्या, मात्र सणाच्या तोंडावर इतर उपाशी राहत असताना मी कशी सण साजरा करू? यातून हे सगळं केलं, त्यात मलाही समाधान मिळाले, अशी भावना त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. (police good work eid aurangabad latest news in marathi)

फहिमुन्नीसा शेख या शहर पोलिस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण कक्षात (सहायता) समुपदेशक आहेत. मागील वर्षी लॉकडाउनमध्ये त्यांनी डोमेगावात काही कुटुंबांना अन्नधान्याची मदत केली होती, डोमेगावच्या महिलांनी गुरुवारी (ता.१३) शेख यांना संपर्क साधत घरातील कर्त्या पुरुषांच्या हाताला काम नाही, रमजानचा सण साजरा करू शकत नसून चिमुकल्यांना काय उत्तरे देऊ? अशी आपबीती कथन केली.

दरम्यान शेख यांनी स्वतः किराणाचे २२ किट खरेदी करत त्यांचा मुलगा आमीर यांच्या मदतीने डोमेगावात दिले. विशेष म्हणजे त्या ऑन ड्यूटीवर होत्या. आपण पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्या परवानगीने जाऊन किट वाटप केल्याची भावना शेख यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT