Police esakal
छत्रपती संभाजीनगर

पोलिस अधिकाऱ्याची दादागिरी! रिक्षाचालकाला शिवीगाळ करित मारले

अनिल जमधडे

औरंगाबाद : आझाद चौकात कारला धक्का लागल्याच्या कारणावरून पोलिस निरीक्षक राजेश मयेकर (Police Inspector Rajesh Mayekar) यांनी रिक्षाचालकाला भरचौकात अश्लील भाषेत शिवीगाळ करीत श्रीमुखात भडकावली. रस्त्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. आझाद चौकामध्ये (Crime In Aurangabad) शनिवारी (ता. सात) सकाळी अकराच्या सुमारास एका मिनी ॲपेरिक्षाचा जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश मयेकर यांच्या कारला धक्का लागला. त्यामुळे मयेकर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ (Crime Against Police) करत, रिक्षाची चावी काढून घेतली. विशेष (Aurangabad) म्हणजे, भररस्त्यात पोलिस निरीक्षकाकडून रिक्षाचालकावर दादागिरी सुरू होती. रिक्षाचालक चावी परत द्या, म्हणत हात जोडून विनंती करत होता.

तसेच कारचे जे काही नुकसान झाले असेल त्याची भरपाई देतो, असे विनवणी करून सांगत होता. त्यावर साडेदहा लाख रुपये मला दे, असे म्हणत चल पोलिस स्टेशनला, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, असे सुनावतानाच त्याच्या श्रीमुखात भडकावली. पोलिसाच्या या अरेरावीचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याची भावना जनसामान्यांतून व्यक्त होत होती. या प्रकरणात उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली नाही.

वाहनाला धक्का लागला म्हणून ही घटना घडली आहे. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी भररस्त्यात अशा पद्धतीने शिवीगाळ करणे किंवा चुकीचे वर्तन करणे योग्य नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

- दीपक गिऱ्हे, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT