political leaders of sambhajinagar worried about assembly election ticket  Sakal
छत्रपती संभाजीनगर

विधानसभेच्या तिकिटाचे आतापासूनच ‘टेन्शन’!

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शहरातील पूर्व-पश्चिम-मध्य, तर ग्रामीणचे कन्नड, वैजापूर-गंगापूर-खुलताबाद हे विधानसभा मतदारसंघ येतात.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूक झाली, की साधारणतः सहा महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महायुती-महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर त्या-त्या विधानसभा मतदरासंघांतील विद्यमान आमदार आणि भावी आमदारांना कामाला लावले होते. आता या विद्यमान; तसेच तिकिटासाठी इच्छुक असलेल्या सर्वच पक्षांतील भावी आमदारांना टेन्शन आले आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शहरातील पूर्व-पश्चिम-मध्य, तर ग्रामीणचे कन्नड, वैजापूर-गंगापूर-खुलताबाद हे विधानसभा मतदारसंघ येतात. यात शहरातील पूर्व व ग्रामीणमधील गंगापूर मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. पश्चिम, मध्य आणि वैजापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत.

कन्नड या एकमेव विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत आमदार आहे. या सगळ्यांवर आपापल्या मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर थेट मताधिक्य मिळाले नाही, तर विधानसभेला उमेदवारी देताना विचार केला जाईल, अशा इशाराच दिला होता. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार टेन्शनमध्ये आले आहेत.

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ६३ टक्के एवढे मतदान झालेले आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांचा विचार केला, तर गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, पश्चिमचे संजय शिरसाट, मध्यचे प्रदीप जैस्वाल यांचे ‘प्रगतिपुस्तक’ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समजेल.

ग्रामीणमध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विकासकामासाठी भरमसाठ निधी देण्यात आला. त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडून महायुतीच्या भुमरेंना सर्वाधिक मताधिक्य मिळून देण्याची चिंता आहे, तर याच मतदारसंघात महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यासाठी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावली. खैरेंना मताधिक्य मिळाले, तर त्यांच्यासाठी तिकिटाची लढाई सोपी राहील.

अशीच परिस्थिती गंगापूर विधानसभा मतदारसंघात कृष्णा पाटील डोणगावकर यांची असणार आहे. इथे भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनी भुमरेंसाठी आपली सगळी यंत्रणा नियोजनबद्धपणे वापरल्याची चर्चा आहे. तीन टर्मपासून बंब या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने आपल्या अनुभवाचा फायदा त्यांनी कसा घेतला, याचे उत्तर निकालानंतर मिळेल.

इच्छुकांचा जीव टांगणीला

कन्नड विधानसभा मतदारसंघात पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले आमदार उदयसिंह राजपूत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. इथे त्यांना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना रोखून खैरेंना मताधिक्य मिळवून देण्याचे मोठे आव्हान होते. यात ते यशस्वी झाले, तर त्यांना ठाकरेंकडून दुसऱ्यांदा उमेदवारीचे रिटर्न गिफ्ट मिळू शकते. एकूण भुमरे-खैरेंच्या निवडणुकीत महायुती-महाविकास आघाडीच्या आमदारांसह इच्छुकांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT