Pankaja Munde And Dhananjay Munde News 
छत्रपती संभाजीनगर

राजीनाम्यावरुन मुंडे बहीण-भाऊ पुन्हा समोरासमोर, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर राजकारण!

गणेश पिटेकर

औरंगाबाद : काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आक्रमक झाल्याच्या दिसतात. वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात होती. सर्व बाजूंनी दबाव वाढल्यानंतर रविवारी राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणावर जाहीर भूमिका घेताना माजी मंत्री पंकजा मुंडे दिसल्या नाहीत. एखाद ट्विट सोडले तर! दुसरीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पूजाची हत्या नसून आत्महत्या असल्याचे औरंगाबादेत म्हटले होते. मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता. नंतर तिने याबाबत पोलिसांकडे केलेली तक्रार मागेही घेतली आहे. धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी सावध भूमिका घेतली होती.


आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी जाहीर मागणी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. आतापर्यंत त्या गप्प का होत्या? पूजा चव्हाण ही त्यांच्या जिल्ह्यातील रहिवाशी आहे. पूजाने पंकजा यांच्याबरोबर कामही केलेले आहे. असे असताना त्या गप्पच होत्या. दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या चित्रा वाघ पूजा चव्हाण प्रकरण दाबण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचा सातत्याने म्हटले आहे. चौफेर टीका आणि दबावानंतर शेवटी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.


भाजपमध्ये सर्वांत प्रभावशाली म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. पूजा प्रकरणी वाघ या सातत्याने बोलताना दिसतात. मुंडे कुठेच दिसत नव्हत्या. आपणही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत संवेदनशील आहोत असे त्यांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगायचे असेल! त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर सामाजिक न्यायमंत्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT