Health Education sakal
छत्रपती संभाजीनगर

Health Education : फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी पीजी प्रवेश सुरू...विद्यार्थ्यांना १३ ऑक्टोबरपर्यंतची मुदत

Health Education : फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि संबंधित पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्‍चित करण्याची मुदत आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : साहाय्यभूत ठरणाऱ्या वैद्यकीय सेवांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशासाठी मंगळवारी (ता. आठ) पहिली निवड यादी जाहीर झाली. पीजीपी, पीजीओ, एमएस्सी (एसएलपी), (ऑडिओ), (पीॲण्डओ) अभ्यासक्रम फिजिओथेरपी (एमपीटीएच), ऑक्युपेशनल थेरपी (एमओटीएच), स्पीच आणि लँग्वेज पॅथॉलॉजी, ऑडिओलॉजी या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाला बुधवारी (ता. ९) सुरवात झाली.

प्रवेशासाठी संस्था स्तरावरील फेरीचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर झाले आहे. पीजीपी, पीजीओ, एमएस्सी (एसएलपी), (ऑडिओ), (पीॲण्डओ) अभ्यासक्रम फिजिओथेरपी (एमपीटीएच), ऑक्युपेशनल थेरपी (एमपीटीएच), स्पीच आणि लँग्वेज पॅथॉलॉजी, ऑडिओलॉजी या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी केंद्रीभूत प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटीचा निकाल १९ सप्टेंबरला जाहीर झाला.

त्यानंतर या अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठीची प्रक्रिया राबवण्यात आली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी ता. ४ रोजी जाहीर झाली. ता. ४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्यासाठीचा वेळ होता. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी मंगळवारी निवड यादी जाहीर होऊन बुधवारी प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ता. १३ पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चिती करता येणार आहे.

२६ पासून संस्था स्तरावरील प्रवेश

दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी १५ ऑक्टोबरला यादी जाहीर होईल. १६ ते १९ ऑक्टोबर ही प्रवेश प्रक्रिया होईल. त्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी २१ ऑक्टोबरला प्रवेश यादी जाहीर होईल. त्यानंतर २२ ते २५ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चिती करायची आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अशी माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT