औरंगाबाद : जलजीवन मिशनचे तत्काळ आराखडे तयार करा  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : जलजीवन मिशनचे तत्काळ आराखडे तयार करा

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण : शासन नियुक्‍त सहाय्यकारी संस्थेला सूचना

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गावाचा पाणीपुरवठा आराखडा तयार करतेवेळी कायमस्वरूपी उद्भव, बळकटीकरण यावर भर देण्यात यावा तसेच शाळा व अंगणवाडी मध्ये नळजोडणी करून पाणीपुरवठा करावा, या कामी शासनाकडून नियुक्‍त सहाय्यकारी संस्थेने पुढाकार घेऊन तत्काळ आराखडे तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या.

जिल्ह्यात जल जीवन मिशन प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत उप संचालक आरोग्य कार्यालयात गुरुवारी (ता.९) आढावा बैठकीचे घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सुदर्शन तुपे, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, रामूकाका शेळके तसेच सर्व गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठाचे उपअभियंता, शाखा अभियंता, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ञ, सल्लागार तालुकास्तरावरील गट समन्वयक, समूह समन्वयक उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यात जल जीवन मिशन प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रति व्यक्तींना प्रति दिन ५५ लिटर पाणी पुढील ३० वर्षापर्यंत मिळण्यासाठी शाश्वत स्वरूपाचा आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेने तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तर सीईओ नीलेश गटणे यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेऊन जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ९० दिवस उपक्रमाचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच स्वच्छ भारत मिशन चा आढावा प्रकल्प संचालक सुदर्शन तुपे यांनी घेतला. गावात घनकचरा सांडपाणी शोषखड्डे, सार्वजनिक शौचालय, मोबाइलद्वारे प्रतिक्रिया, पाणी नमुने संकलित करण्याच्या सूचना दिल्या. या आढावा बैठकीला महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या सहाय्यकारी संस्था सेवा, सेक्रेड, सिग्मा व वॅपकॉसचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT