संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

कटिंगवर टक्कल पण दाढीवर सापडेना शक्कल!

प्रवीण मुके

औरंगाबाद- सलूनची दुकाने दोन-अडीच महिन्यांपासून बंद आणि त्यातच कोरोनाच्या संसर्गाची भिती पाठिशी असल्याने घरच्या घरी दाढी करण्याची वेळ आली आहे. परंतु, ९० टक्के लोकांना याची सवय राहिलेली नाही. त्यांनी घरी दाढी घोटताना काळजी घ्यायलाच हवी, अन्यथा त्वचेचीच ‘हजामत’ होऊ शकते! असा सल्ला त्वचारोगतज्ज्ञ आणि व्यावसायिक सलूनचालकांनी दिलाय. 

दोन महिन्यांपासून दुकाने बंद 
शहरात लॉकडाउन लागू झाले आणि जीवनावश्‍यक वस्तु वगळता सर्वच दुकाने बंदचे आदेश निघाले. कोरोनाचा संसर्ग होऊ शकेल, अशा ठिकाणांमध्ये हेअर सलूनचाही समावेश असल्याने ही दुकानेही तेव्हापासून बंद झाली. कटिंगचा प्रश्‍न साधारणपणे महिनाभरानंतरच येतो, पण दाढीचे खुंट तर आठवड्याला ‘आ’ वासून तयारच असतात. शिवाय डोक्यावरील केस कटिंगचा प्रश्‍न अनेकजण टक्कल करून सोडविताहेत पण दाढीच्या हजामतीचे काय करणार? त्यामुळेच आता बाजारातील ‘आधुनिक वस्तऱ्यां’ना चांगलाच भाव आलाय. तथापि, घरीच दाढी करताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

अशी घ्या काळजी 
व्यावसायिक सलूनचालक व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे कोषाध्यक्ष सोपान शेजवळ यांनी सांगितले, की सध्याच्या काळात घरी दाढी करताना सुरवातीला हाताला सॅनिटायझर लावायला हवे. साबण किंवा शेवींग क्रीम लावल्यानंतर दाढी चांगली भिजू द्यावी, म्हणजे केस काढताना त्रास होत नाही. त्यासाठी गरम किंवा कोमट पाणी घेतल्यास उत्तम. शक्यतो एकच हात व्यवस्थित घेतल्यास दाढी चांगली होते. उगाच गुळगुळीत करण्याच्या नादात दोन-तीन हात मारू नये आणि उलटा हात तर कधीच घेऊ नये. कारण त्यानंतर काही दिवसांनी दाढीचे केस कडक, राठ होतात. अक्षरशः बारीक सुया टोचल्यासारखे वाटते. दुसरी बाब म्हणजे, दाढी झाल्यावर ‘आफ्टर शेव’ चांगल्या दर्जाचे आणि अँटीसेप्टींग घटक असलेले वापरावे. म्हणजे, चुकून ब्लेड लागल्यास झालेली जखम लवकर भरून निघेल. दाढी झाल्यानंतर सर्व साहित्य निर्जंतूक करून काही वेळ उन्हात ठेवावे. 

लॉकडाउन असो की नंतरचा काळ, दाढी शक्यतो घरीच करायची सवय ठेवावी. यामुळे ‘क्रॉस इन्फेक्शन’ टाळले जाते. जास्त गुळगुळीत करण्याच्या भानगडीत पडू नये. दुसरी गोष्ट म्हणजे, सद्यस्थितीत अमेरिकन गाईडलाईननुसार, मास्क व्यवस्थित फिट बसला पाहिजे, अशा पद्धतीने दाढीवरील केस काढावेत. या गाईडलाईन्स वैद्यकीय क्षेत्रासाठी असल्या तरी सर्वांसाठी फायदेशीर आहेत. शिवाय दाढी झाल्यानंतर साबणाने चेहरा धुवून काढावा आणि मॉइश्‍चरायझर लावावे. ज्यांना ड्रायनेसचा त्रास असतो त्यांनी ‘आफ्टर शेव’पेक्षा मॉइश्‍चरायझर लावणे केव्हाही चांगले. 
डॉ. अनुपम टाकळकर, त्वचारोगतज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

SCROLL FOR NEXT