Prof. Jogendra Kawade has said that the name of Pune district should be Sambhajinagar.jpg 
छत्रपती संभाजीनगर

पुणे जिल्‍ह्याचे नामकरण ‘संभाजीनगर’ करा

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद : संभाजी महाराजांचा गौरव करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादनासाठी प्रा. कवाडे औरंगाबादेत दाखल झाले होते. शहर नामांतराचा विषय चांगलाच गाजत आहेत. याविषयी प्रा. कवाडे यांना भूमिका विचारली असता ते म्हणाले, की औरंगाबादचे नाव बदलू नये, त्याऐवजी पुणे जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करण्यात यावे. पुण्यातील वढू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. दलित समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. यामुळे आता पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे २६ जानेवारीपासून 'आत्मनिर्भर, अत्याचार प्रतिकार अभियान' राबविण्यात येणार असल्याचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. गावागावात जाऊन प्रबोधन करण्यात येणार आहे. आठवले वारंवार संविधानाचा अपमान करतात. 

केंद्र सरकारच्या तीन कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. हे तीन कायदे करण्याअगोदर एका मोठ्या उद्योजकासोबत केंद्र सरकारची बैठक झाली. त्यानंतर त्या उद्योजकांनी पानिपत येथे शंभर एकरांवर गोदाम सुरू केले. हे तिन्ही काळे कायदे रद्द करावेत. याच कायद्याचे समर्थन करणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे वारंवार संविधानाचा अपमान करीत आहेत. संविधान नष्ट करू पाहणाऱ्यांचे समर्थन करणारे रामदास आठवले हे संविधानवादी आहेत का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. तसेच वंचित आघाडी म्हणजे संधिसाधूंचा पक्ष आहे. तर जाती टिकवून ठेवण्यासाठी भारतीय बौद्ध महासंघ काम करीत असल्याचा आरोपही कवाडे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT