Purchasing Of Pomegranate And Tomato In Karmad Sub-market, Sunil Kendrekar Aurangabad News
Purchasing Of Pomegranate And Tomato In Karmad Sub-market, Sunil Kendrekar Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांच्या शेतमालास माफक भाव मिळावा - सुनील केंद्रेकर

संतोष शेळके

औरंगाबाद : लिलाव सुरू असतांना उत्पादक शेतकर्‍याला किमान माफक भाव मिळावा सोबतच हा बाजार समितीला असलेल्या अपेक्षित भावासारखा तरी असावा असे स्पष्ट मत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी करमाड येथे रविवारी (ता.५) व्यक्त केले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजार पेठेतील डाळिंब व टोमॅटो आडत बाजाराचे प्रारंभ श्री.केंद्रेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हरिभाऊ बागडे होते. तर विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, कृषीभुषण विजयअण्णा बोराडे, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती हरिचंद्र ठोंबरे , संचालक दामोधर नवपुते, गणेश दहिहंडे , सजनराव मते, बाबासाहेब मुगदल, शिवाजी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सभापती राधाकिसन पठाडे यांनी प्रास्ताविक केले. सुनील केंद्रेकर म्हणाले, शेती व शेतकरी हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे.आजस्थितीत फळ पिके काढणे कढीण काम होऊन बसल्याने खरेदीदार व्यापार्‍यांनी आपली आडत व स्वत:च्या नफ्यासोबत शेतकर्‍यांच्या नफ्याचाही विचार करण्याचे आवाहन केले. यासाठीच बाजार समित्यांची निर्मीती झाल्याचेही श्री. केंद्रेकर सांगितले. येथील बाजारपेठेतील केलेल्या प्रशस्त कामाचे कौतुक करत हरिभाऊ बागडे यांच्या नियोजनाचेही श्री.केंद्रेकर यांनी कौतुक केले. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत आहे. यामुळे जनतेने कोरोनाला हलक्यात घेऊ नयेत. कोणी मास्क, रूमाल न लावता फिरु नये, सोबतच इतर प्रतिबंधात्मक उपाय योजनेनंतरच आपण या आजाराला नियंत्रित ठेऊ शकतो असेही श्री. केंद्रेकर म्हणाले. 

तर यावेळी आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले शेतकर्‍यांनी बाजारपेठेत शेतमाल आणतांना तो प्रतवारीकरूनच आणावा, जेणेकरून त्याला योग्य भाव मिळेल. दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र कमी-कमी होत असल्याने कमीत-कमी क्षेत्रात जास्त उत्पादन व तेही कमी खर्चात मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे आवाहन आमदार बागडे यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच,सेवा संस्थांचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा-  मुलीला उलटी आली म्हणून बॅंकमॅनेजरने कार थांबवली अन....  

पहिल्याच दिवशी डाळिंबाच्या दिड हजार कॅरेट विक्री 
खरेदीस प्ररंभ झाल्यानंतर आज १ हजार ५९५ कॅरेट डाळिंबाची विक्री झाली. त्यास पाच हजार २०० रुपये दर मिळाला. आज डाळींब घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी मिळालेल्या दराचा मोठा फयदा झाला. गेल्या वर्षी ५० हजार कॅरेटची विक्री झाली होती. यातुन दोन लाख रुपयांचे फिस बाजार समितीला मिळाली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT