Crime 
छत्रपती संभाजीनगर

रेल्वे गॅंगमन रुळाची पाहणी करताना कुख्यात गुन्हेगाराने फोडले डोके, सोन्याचे पदकही लूटले

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: रेल्वे रुळाची तपासणी करताना कुख्यात गुन्हेगारांनी गॅंगमनला रॉडने मारहाण करुन लुटल्याची घटना शुक्रवारी (ता.९) सकाळी सातच्या सुमारास संग्रामनगर रेल्वे रुळावर घडली. विजय चंद्रभान नितनवरे (४२) असे जखमी गॅंगमनचे नाव आहे.

यावेळी दोन लुटारुंनी सोन्याचे पदक आणि चार हजारांची रोकड हिसकावून नेली. कुख्यात गुन्हेगार अमोल गल्हाटे याच्यासह त्याच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास विजय नितनवरे हे नेहमीप्रमाणे रेल्वे रुळाची तपासणी करत होते. त्यावेळी तेथे आलेल्या अमोल गल्हाटे व त्याच्या साथीदाराने नितनवरे यांच्याशी काहीवेळ गप्पा मारल्या.

तिघेही बोलत असतानाच अचानक एकाने त्यांच्या डोक्यात रॉड मारला. तर दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे तीन ते चार ग्रॅमचे पदक आणि खिशातील चार हजारांची रोकड हिसकावली. दोघेही पसार झाल्यानंतर नागरिकांनी नितनवरे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रध्दा वायदंडे, विशेष पोलिस अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील, रेल्वेचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा, सहायक फौजदार दिलीप कांबळे, रेल्वे अभियंता अजितकुमार यांनी भेट दिली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक शशीकांत तायडे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT