Abdul Sattar_Santosh Danave 
छत्रपती संभाजीनगर

रावसाहेब दानवेंचे पुत्र मविआला मतदान करणार; सत्तार यांचा दावा

दहा तारखेलाच कळेच काय होतंय ते, असंही सत्तार यांनी म्हटलंय.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे हे राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला मतदान करतील असा दावा शिवसेनेचे मंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळं राज्यसभेच्या निवडणुकीत चुरस पहायला मिळणार आहे. (Raosaheb Danve son Santosh Danve will vote for MVA for Rajya Sabha Abdul Sattar claim)

सत्तार म्हणाले, आम्हाला जर राज्यसभेसाठी एखादं मत कमी पडलं तर आम्ही आमच्या भोकरदनमधील एक आमदार आहेत रावसाहेब दानवेंचे चिरंजीव त्यांना आम्ही निश्चित घेऊ. एमआयएमच्या दोन मतांऐवजी आम्ही एका मताची पूर्तता करुन घेऊ. आम्ही त्यांना विनंती केली आहे, ते आम्हाला मतदान करतील की नाही हे १० तारखेलाच माहिती पडेल.

मला असं वाटतं की शिवभाऊ म्हणून ते आम्हाला मतदान करतील. माझ्या उपकाराची परतफेड करायची असेल तर मत द्यावंच लागेल. मी संतोष दानवे यांच्या वडिलांना रावसाहेब दानवेंना एक लाख मतांची लीड मिळवून दिली होती. त्यामुळं रावसाहेब दानवेंनी त्यांच्या मुलाच्या कानात काही मंत्र दिले त्यांच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं दोघांचं मला कळालं नाही, मी चहा घेऊन आलो त्यांच्या घरुन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT