School Books Sakal
छत्रपती संभाजीनगर

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी चार विषयांचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळांकडून मोठ्या प्रमाणात अभ्यास, सराव घेतला जात आहे.

संदीप लांडगे

औरंगाबाद - कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे (Students) झालेले शैक्षणिक नुकसान (Education Loss) भरून काढण्यासाठी शाळांकडून (School) मोठ्या प्रमाणात अभ्यास, सराव घेतला जात आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे (School Books) आणखी वाढले आहे. मात्र, २०२२-२३ या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व मराठी माध्यमांच्या शाळांत एकात्मिक आणि द्विभाषिक अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयांचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे पहिल्याच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी होईल. सुरुवातीला ही पद्धत पहिलीसाठी आहे, त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी लागू केली जाईल. यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार विषय इंग्रजी, मराठी, गणित, खेळा आणि शिका प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित करण्यात आले आहे. मुलांना सत्रानुसार भाग १, २ किंवा ३ असे, फक्त एकच पाठ्यपुस्तक घेऊन शाळेत यावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी सध्या राज्यातील ४८८ आदर्श शाळांमधे प्रायोगिक तत्त्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक आणि द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश केला आहे. या पथदर्शी प्रकल्पाचे यश पाहता मराठी शाळांमधे याची अंमलबजावणी केली जाईल. त्यादृष्टीने पाठ्यपुस्तकांची रचना राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ करत आहे.

जिल्ह्यातील १७ शाळांचा समावेश

जि.प. शाळा गाडीवाट, शासकीय विद्यानिकेतन (ता.औरंगाबाद), जि.प. शाळा डोमेगाव (ता.गंगापूर), जि.प. शाळा जैतापूर (ता.कन्नड), जि.प. शाळा बाजारसावंगी (खुलताबाद), जि.प. शाळा वरवंडी तांडा (ता.पैठण), जि.प. शाळा ढोरकीन (ता.पैठण), जि.प. शाळा जळगाव (ता.फुलंब्री), जि.प.शाळा (ता.सिल्लोड), जि.प. शाळा सोयगाव, जि.प. शाळा किन्ही (ता.सोयगाव) व मनपाअंतर्गत नारेगाव व बनेवाडी अशा एकूण १७ शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

आरोग्यासाठी खजूर ठरतोय 'नॅचरल सुपरफूड'! पण किती अन् कधी खावे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Odisha Elephant: ओडिशात १८ महिन्यांत ११४ हत्तींचा मृत्यू; सरकारची विधानसभेत माहिती, संरक्षणाचे प्रयत्न, काय आहेत कारणे?

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

SCROLL FOR NEXT