पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल ‘जिनोम सिक्वेंसिंग’ साठी पुण्याला जाणार sakal
छत्रपती संभाजीनगर

पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल ‘जिनोम सिक्वेंसिंग’ साठी पुण्याला जाणार

नागरिकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्यांचेही अहवाल पाठवले जाणार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल जिनोम सिक्वेसिंगसाठी पुणे येथे पाठविण्याचे आदेश घाटीतील प्रयोगशाळेला देण्यात आले आहेत. त्यासोबतच विदेशी पर्यटक आणि नागरिकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्यांचेही अहवाल पाठवले जाणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास अशा रुग्णांचे अहवाल घाटीच्या प्रयोगशाळेतून परस्पर जिनोम सिक्वेसिंगसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. तसेच विदेशातून फिरण्यासाठी व इतर कामासाठी येणारे पर्यटक व नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. या नागरिकांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी जिनोम सिक्वेंसिगसाठी त्यांचा अहवाल पाठविण्याचे सांगण्यात आले आहे. ओमायक्रॉन विषाणूची तपासणी करण्यासाठी घाटी रुग्णालयाच्या प्रयोग शाळेत सुविधा नाही. त्यामुळे हे अहवाल पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवले जात आहे. जिनोम सिक्वेसिंगचा अहवाल मिळण्यास ७२ तासाचा कालावधी लागतो.

दक्षिण आफ्रिकेतील लोकांचे शहरात वास्तव्य

दक्षिण आफ्रिकेतून २२ नोव्हेंबररोजी कंपनीच्या कामानिमित्त एकजण शहरात आला आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये तो राहत आहे. मुंबईत उतरताच त्या व्यक्तीने कोरोना चाचणी केली ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्याची पुन्हा २३ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर सोमवारी आरटीपीसीआर केली असता तीही निगेटिव्ह आल्याचे डॉ मंडलेचा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT