औरंगाबाद : कच्च्या आराखड्यासाठी मागितला दहा दिवसांचा वेळ sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कच्च्या आराखड्यासाठी मागितला दहा दिवसांचा वेळ

महापालिकेचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो १८ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने कच्चा आराखडा तयार केला आहे; पण महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय सध्या दौऱ्यावर असल्याने कच्चा आराखडा पाठविण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मिळावा, असे पत्र महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. दरम्यान, राज्य शासनाने मुंबई वगळता इतर महापालिकांच्या निवडणुका त्रिसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला.

तसेच शहराच्या वाढीव लोकसंख्येनुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णयही नुकताच घेण्यात आला आहे. त्यानुसार ४२ प्रभाग आणि १२६ नगरसेवक महापालिकेत राहणार आहेत. त्याचा कच्चा आराखडा तयार करून १८ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी समिती स्थापन केली. या समितीने प्रभागरचनेसह वॉर्ड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचे मंगळवारी (ता. १६) सांगण्यात आले होते.

मात्र प्रभागरचनेचा कच्चा आराखडा प्रशासकांच्या सहीने पाठविणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासक पांडेय हे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आयोजित प्रशिक्षणासाठी स्पेनला गेले आहेत. त्यामुळे आयोगाला पत्र पाठवून दहा दिवसांचा वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रशासक शहरात आल्यानंतरच महापालिकेच्या प्रभागरचनेचा कच्चा आराखडा अंतिम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT