10th Board Result  sakal
छत्रपती संभाजीनगर

10th Board Result : निवासी शाळांनीही राखली गुणवत्ता ; मराठवाड्यातील सात शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या निवासी शाळांनी दहावी परीक्षेत निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण ११ शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या निवासी शाळांनी दहावी परीक्षेत निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण ११ शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये १, जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी ३, तर परभणी जिल्ह्यामध्ये ४ शासकीय निवासी शाळा कार्यरत असून त्यापैकी ७ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी दिली.

जालना, बीड जिल्ह्यातील तिन्ही, परभणी जिल्ह्यातील एका शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याबद्दल विभागातील सर्व शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचे जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाजकल्याण सचिव सुमंत भांगे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे आदींनी अभिनंदन केले आहे.

दहा गुणवत्ताधारक

विभागातील दहा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्यात भोकरदन (जि. जालना) येथील जीवन सुरडकर याने ९३.२० टक्के आणि धम्मपाल सुरडकर याने ९१.४० टक्के गुण मिळवले आहेत. शिरूर कासार (जि. बीड) येथील सर्वात जास्त ५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्यात शिवनाथ राजगुरू (९४.६०), गौरव वाघुंबरे (९४), प्रेम पारवे (९३.२०), आर्यन त्रिभुवन (९३.२०), सुखदेव नवखंडे (९१.४०) यांचा सामावेश आहे. पाटोदा (जि. बीड) येथील प्रज्ञा अंकुश मोरे या विद्यार्थिनीला ९२.२० टक्के गुण मिळाले. परळी वैजनाथ (जि. बीड) येथील अभिजित केदारे यास ९३ टक्के, तर सुशांत कसबे यास ९१ टक्के गुण मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT