संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

आरआयएमसीची जूनमध्ये प्रवेश पात्रता परीक्षा

संदीप लांडगे

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (आरआयएमसी) साठी महाराष्ट्रातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा एक व दोन जून 2020 रोजी पुण्यात होणार असून, ती फक्त मुलांसाठीच आहे. 

परीक्षेसाठी एक जानेवारी 2021 रोजी 11 वर्षे सहा महिन्यांहून अधिक वय असलेले व 13 वर्षांपेक्षा अधिक वय नसलेले विद्यार्थी पात्र आहेत. हा विद्यार्थी एक जानेवारी 2021 रोजी मान्यताप्राप्त शाळेतून सातवी उत्तीर्ण झालेला असावा किंवा सातवीत शिकत असावा. या परीक्षेसाठीचे अर्ज कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड 248003 यांच्याकडून मागवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह 555 रुपयांचा व खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी 600 रुपयांचा 'डिमांड ड्राफ्ट' पाठवायचा आहे. हा डिमांड ड्राफ्ट फक्त 'स्टेट बॅंक ऑफ इंडिया'चाच आणि कमांडंट, आरआयएमसी, डेहराडून या नावाने काढावा. 

हा ड्राफ्ट पेएबल ऍट डेहराडून (तेलभवन बॅंक कोड नं. 01576) अशी नोंद करावी. ड्राफ्ट पाठवल्यानंतर 'आरआयएमसी'कडून परीक्षा अर्ज, माहितीपत्र व मागील दहा वर्षातील प्रश्नपत्रिकांचे संच कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेजकडून पोस्टाने पाठविण्यात येतील. पूर्ण भरलेला दोन आवेदनपत्र 31 मार्च 2020 पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळासमोर, पुणे 411001 या पत्त्यावर पाठवावीत. सोबत जन्मतारीख, जातीचा दाखला, अधिवासी दाखल्याची प्रत व शाळेचे बोनाफाइड सर्टिफिकेट मूळ प्रत फोटोसह जोडणे आवश्‍यक आहे. 

परीक्षेसाठी इंग्रजी, गणित, सामान्यज्ञान या तीन विषयांचे पेपर असतील. गणित, सामान्यज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी, हिंदी भाषेतच उपलब्ध होतील. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती सहा ऑक्‍टोबर 2020 रोजी घेण्यात येईल, असे माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे, आयुक्त तुकाराम तुपे प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT