sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : घरफोडीच्या दोन घटनांत चार लाखांचा ऐवज लंपास

घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी चार लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सिडको एन १ आणि सिडको एन ७ भागात हे प्रकार उघडकीस आले. या प्रकरणी सिडको व सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी चार लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सिडको एन १ आणि सिडको एन ७ भागात हे प्रकार उघडकीस आले. या प्रकरणी सिडको व सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. सिडको एन ७, अयोध्यानगर येथील सविता कारभारी पिंपळे (३०) या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्या २४ डिसेंबरला मुलीच्या शाळेत स्नेहसंमेलन असल्याने दागिने घालून गेल्या होत्या. घरी आल्यानंतर त्यांनी दागिने काढून कपाटातील लॉकरमध्ये ठेवले.

२७ डिसेंबरला त्यांना एका लग्नाच्या रिसेप्शनला जायचे असल्यामुळे त्यांनी दागिने काढण्यासाठी कपाट उघडले. यावेळी त्यांना लॉकर बंद असल्याचे दिसून आले. लॉकरची चावी त्यांनी शोधली असता ती सापडली नाही. त्यांच्या पतीने हातोडीचा वापर करीत लॉकर उघडले. यावेळी लॉकरमध्ये दागिने दिसून आले नाही. चोरट्याने लॉकरच्या चाव्या आतमध्येच ठेवत १ लाख २७ हजारांचे दागिने लंपास केले.

एन-१ भागात चोरी

दुसरी चोरीची घटना ३० डिसेंबर ते २ जानेवारीच्या दरम्यान प्लॉट क्रमांक २१६, एन १ भागात घडली. पद्मावती आनंद धारवाडकर (४८) यांनी तक्रार दाखल केली, की ते सहकुटुंब ३० डिसेंबरला सकाळी पुणे येथे लग्नासाठी गेले होते. २ जानेवारीला त्यांना त्यांचे शेजारी अभय देशमुख यांनी ‘तुमच्या घराला फक्त कडी लावलेली आहे’, अशी माहिती दिली.

धारवाडकर यांनी सांगितल्याने देशमुख यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त तसेच कपाटे उघडी असल्याचे दिसून आले. धारवाडकर कुटुंब घरी परतले असता चोरट्यांनी घरातील कपाटातील २ लाख ८३ हजाराचा ऐवज लांबविल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT