Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime News : घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास ; नारेगाव, भाट गल्ली येथील घटना

मजूर कुटुंबाच्या उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्याने ३ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख अडीच लाख रुपयांचा समावेश आहे. तीन मार्चला रात्री हा प्रकार भाट गल्ली, नारेगाव येथे घडला.

सकाळ वृत्तसेवा

नारेगाव : मजूर कुटुंबाच्या उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्याने ३ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख अडीच लाख रुपयांचा समावेश आहे. तीन मार्चला रात्री हा प्रकार भाट गल्ली, नारेगाव येथे घडला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अलका साईनाथ धुमाळ (वय ४५, रा. भाटनगर, नारेगाव) या महिलेने तक्रार दाखल केली. धुमाळ यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते सध्या कुशाराम काळे यांच्या घरात किरायाने राहतात. ३ मार्चला रात्री धुमाळ यांचा मुलगा रोहित हा फोटोग्राफी शूटिंगची ऑर्डर करून घरी आला. यावेळी त्याने त्याची कॅमेऱ्याची बॅग घरात ठेवली. रात्री जेवण झाल्यानंतर धुमाळ कुटुंब झोपी गेले.

घरातील दरवाजा हा फुगलेला असल्याने त्याची कडी लागत नसल्याने त्यांनी दरवाजा फक्त लोटून घेतला होता. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या सुनेला तिचा मोबाइल घरात आढळला नाही. तसेच मुलाची कॅमेऱ्याची बॅगदेखील जागेवर नव्हती.

धुमाळ यांनी तपासणी केली असता त्यांना त्यांचेदेखील मोबाइल तसेच सेंट्रिंगचे लाकूड कापायची मशीन आणि कपाटातील रोख अडीच लाख रुपये दिसून आले नाहीत. त्यावरून घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी ३ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास केला. धुमाळ यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक पठाण पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi News:'शिर्डीतील पाहुण्यांची काश्मिरी लग्नास हजेरी'; पारंपरिक सोहळ्यात तीन दिवस घेतला पाहुणचार, आदरातिथ्याने भारावले

Ajit Pawar : अजित पवारांच्या बनावट पत्रावर सुचविली एक कोटीची कामे; जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावर बनावट स्वाक्षरी!

Latest Marathi News Live Update : लाचखोरी प्रकरणी नायगाव पंचायत समितीचे 9 गृहनिर्माण अभियंता कार्यमुक्त

Women's World Cup Semifinal: लक्ष्य एक; पण अडचणी अनेक, महिला विश्वकरंडक, भारतासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान

MLA Amol Khatal: पर्यटनासाठी २ कोटींच्या कामांना मान्यता: आमदार अमोल खताळ; तालुक्याला नवचैतन्य मिळणार

SCROLL FOR NEXT