photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

वाहनांच्या विक्रीसाठी डिस्काउंटचा तोडगा, काय आहे प्रकरण : वाचा 

अनिल जमधडे

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ‘भारत स्टेज -४’ (बीएस फोर) मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयात १ एप्रिलपासून थांबविण्यात येणार आहे. सध्या वाहन विक्रेत्यांनी भरघोस डिस्काउंट जाहीर केला आहे. चारचाकींची सहज विक्री होईल, अशी सध्याची परिस्थिती आहे; मात्र दुचाकींचा भरमसाठ साठा असल्याने शेवटच्या आठवड्यात आणखी डिस्काउंट वाढवून वाहनांची विक्री करवी लागण्याची शक्यता आहे. 

देशभरात १ एप्रिलनंतर भारत स्टेज -चार (बीएस फोर) मानांकन नसलेली वाहने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विक्री व नोंदणी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी ‘बीएस - फोर’ मानांकनाची वाहने खरेदी केली आहे; अशा वाहनधारकांनी त्याची नोंदणी ३१ मार्च २०२० पूर्वी करून त्यांना नोंदणी क्रमांक जारी होणे आवश्यक आहे. 

तर रस्त्यावर नाही

ही वाहने ३१ मार्चपूर्वी नोंदणी न झाल्यास त्यांना रस्त्यावर वापरता येणार नाही. ३१ मार्च किंवा त्यापूर्वी होणारी नोंदणीची गर्दी पाहता तसेच ऐनवेळी कागदपत्रांत काही त्रुटी उद्भवण्याची शक्यता आहे. शुल्क व कर भरल्याने, व्हीआयपी क्रमांकाची फी भरल्याने, मोटार वाहन निरीक्षकाकडे वाहन तपासणीसाठी सादर केल्याने अथवा मोटार वाहन निरीक्षकाने तपासणी केल्याने वाहनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही. 

नोंदणीची खात्री करणे आवश्यक

वाहनास नोंदणी क्रमांक जारी झाल्यावरच सदर वाहनाची नोंदणी प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण होते. सर्व वाहनधारकांनी त्यांच्या मालकीची वाहने नोंदणी झाली असल्याबाबत खात्री करावी. ज्या वाहन मालकांना वाहनाचे मूळ स्मार्टकार्ड आरसी, नोंदणी पुस्तक प्राप्त झाले नाही त्यांनी त्यांचा वाहन क्रमांक www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध पर्यायामध्ये तपासून घ्यावा. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये. यासाठी ३१ मार्चपूर्वी वाहनधारकांनी आप-आपल्या वाहनांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT