rumors of strike of truck driver citizens at petrol pump company and administration spread awareness Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : संप मोबाइलवर, रांगा पंपांवर! वाहनधारकांच्या गर्दीने शहरासह परिसरातील काही पेट्रोल पंप ड्राय

नागरिकांनो, घाबरू नका प्रशासनासह कंपन्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘येत्या दहा तारखेपासून ट्रक चालकांचा संप होणार आहे, म्हणून उद्यापासून पेट्रोल पंप बंद राहतील’’ अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडीयावर व्हायरल झाले आणि पाच-दहा लिटर पेट्रोल मला एकट्यालाच मिळाले पाहिजे, या आपल्या ‘खास’ मानसिकतेमुळे पेट्रोल पंपांवर अक्षरशः रेटारेटी, लोटालोटी झाली. त्यामुळे नारेगावसह शहरातील अनेक पंप ड्राय झाले.

दरम्यान, हा संप होणार का नाही, याबाबत अधिकृत काहीच घोषणा झालेली नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका, पेट्रोल पंपांवर गर्दी करू नका, सर्वांना इंधन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी दिली.

रविवारपासून ट्रक चालकांचा संप होणार आहे, सर्वांनी सहभागी व्हावे. यात पेट्रोल पंपही बंद राहतील, असे मेसेज सोशल मीडीयावर फिरवले गेल्यामुळे सोमवारी (ता.आठ) सकाळपासून शहरासह परिसरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या.

गेल्या वेळी पेट्रोल-डिझेल न मिळाल्यामुळे वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. यावेळी आपल्यावर वाहन ढकलण्याची वेळ येऊ नये, म्हणून वाहनधारकांनी पंपांवर गर्दी केली. यात सर्वाधिक दुचाकीधारकांची संख्या होती.

जो-तो पंपावर जाऊन टाकी फुल्ल करा असे सांगत होता. यामुळे अनेक पंपांवर वाहनधारकांमध्ये वादही झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

जालना रोडवरील पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनांच्या रांगा थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली. तिकडच्या पंपावर किती गर्दी आहे? अशी विचारणा वाहनधारक इतरांना करीत होते.

यामुळे एका-एका पंपावर इंधन भरण्यासाठी एका वाहनधारकाला एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागत होते. रात्री उशिरापर्यंत हे चित्र कायम होते. दरम्यान, स्टॉक असेपर्यंत पंप सुरु राहणार आहेत, यामुळे वाहनधारकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पंपचालकांतर्फे करण्यात येत आहे.

ट्रक चालक १० जानेवारीपासून संप करणार असल्याची माहिती सोशल मीडियावर कुणीतही पसरवली. या संपात इंधन घेऊन येणारे टँकरचे चालक सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

टॅंकर चालकांनी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे वाहनधारकांनी पंपावर जाऊन गर्दी करू नये. यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. जिल्ह्यातील प्रत्येक पंप चालक वाहन धारकांना इंधन मिळण्यास अडचण येऊ नयेत, याची काळजी आम्ही घेत आहोत. याला तुमची साथ पाहिजे. शहर व जिल्ह्यातील कोणताही पंप ड्राय होऊ नये, असा आमचा पहिला प्रयत्न आहे.

— अखिल अब्बास, अध्यक्ष, पेट्रोल डीलर असोसिएशन

प्रत्येक पंप चालकाकडे जास्तीत जास्त इंधनाचा स्टॉक राहावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यानुषंगाने आम्ही सर्वांना आवाहन करीत आहोत. आपल्याला गरजे पुरतेच इंधन भरा, इतरांनाही इंधन मिळेल याचाही विचार करावा.

— नवींदर सिंग, सहसचिव, पेट्रोल डीलर असोसिएशन.

ट्रान्सपोर्ट किंवा चालकांच्या कुठल्याही संघटनेने अधिकृत संप जाहीर केलेला नाही. पेट्रोल संपेल ही अनाठायी भावना आहे. त्यामुळे पंपांवर रांगा लागल्या आहेत. पेट्रोलचा पुरवठा सुरळीत सुरु राहणार आहे. वाहनधारकांनी अनावश्यक गर्दी करु नये, पंप सुरुच राहणार आहेत. त्यामुळे कुणीही घाबरण्याचे कारण नाही.

— जनार्धन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT