ट्रक  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : केबिन उडाली तरी खुमखुमी... ट्रक चालकाचा धक्कादायक प्रवास, RTO पोलिसांचे दुर्लक्ष

केबिनचा चक्काचूर झाल्यानंतरही धोकादायक प्रवास

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झालेला...तिथं बसायलाही पुरेशी जागा उरली नाही...तरी पठ्ठ्याची वाहन चालविण्याची खुमखुमी काही कमी झाली नाही. तशाच स्थितीत ‘तो’ ट्रक दामटतच राहिला. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष जातच होते; पण आरटीओच काय, तर पोलिसांना मात्र ‘तो’ दिसत नव्हता.

केबिनचा सांगाडाच उरलेला असूनही अत्यंत जोखमीचा प्रवास करणारा हा ट्रक चालक पाहून चालक धोक्यात की ट्रक धोक्यात की अवघ्या रस्त्यावरचे धोक्यात असा तिहेरी प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहिला नाही. कोणीही न हटकल्याने ‘तो’ सरळ पोलीस ठाण्यासमोरून बिनधास्त निघूनही गेला!

पंढरपूरकडून वाळूजमार्गे गंगापूरच्या दिशेने मंगळवारी (ता.२७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक मालवाहतूक करणारा ट्रक गेला. कंटेनरवजा असलेल्या या ट्रकच्या केबिनचा संपूर्ण चक्काचूर झालेला होता. त्यामुळे समोर फक्त ट्रक चालवताना चालकच दिसत होता. त्याचा हा प्रवास अत्यंत धोकादायक व अपघातास कारणीभूत ठरणारा होता. असे असूनही हा ट्रकचालक बिनदिक्कतपणे छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरून गंगापूरच्या दिशेने सुसाट निघून गेला.

एरवी ‘सीट बेल्ट’ नसला, की पोलिसांची ‘नजर’ काचेतून आत घुसून बरोब्बर त्या वाहनाच्या चालकाला थांबण्याचा इशारा करते. नंबर प्लेट नसली की हातवारे करून वा शिट्ट्या वाजवून पोलिस बांधव वाहने थांबवतात. एवढेच नव्हे, तर वाहतुकीचा लहानात लहान नियम लावून वाहनधारकांना दंड भरण्यास सांगतात आणि ते योग्यही आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी.

मात्र, मंगळवारी अत्यंत धोकादायक स्थितीत गेलेल्या ट्रकचा चालक तर नियम मोडणाऱ्यांचाही ‘बादशहा’ होता. याकडे ना आरटीओचे, ना वाहतूक शाखेचे किंवा ना स्थानिक पोलिसांचे लक्ष गेले. काहीजण तर वाहने थांबवून त्या ट्रककडे ‘डोळे भरून’ पाहत होते. मात्र, ‘तो’ कोण? कुठला? होता, त्याने असा प्रकार का केला? त्याला कुणाची भिती वाटली नाही का? स्वतःची तसेच इतरांच्या जिवाचीही पर्वा त्याने का केली नाही? हे सारे प्रश्‍न अनुत्तरीत ठेऊनच तो सुसाट अन् बिनधास्त निघून गेला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT