धनुष्यबाण  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : जर गद्दार असतो, तर पक्ष अन् चिन्ह मिळाले नसते ; पालकमंत्री संदीपान भुमरे

क्रांतीचौक भागातून निघणाऱ्या या रॅलीचा समारोप छत्रपती संभाजी महाराज यांच्या हडको

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जर आम्ही गद्दार, खोके घेणारे असतो, तर आम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळाले नसते. शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे, ही बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम शिवसेना (शिंदे गट) पक्षाने करून दाखवले. येत्या ८ किंवा ९ एप्रिल रोजी शिवसेनेच्या वतीने शहरातून धनुष्यबाण चिन्हाची रॅली काढण्यात येणार आहे.

क्रांतीचौक भागातून निघणाऱ्या या रॅलीचा समारोप छत्रपती संभाजी महाराज यांच्या हडको येथील पुतळ्याजवळ करण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तिथे भव्य सभा होणार आहे. या रॅली आणि सभेच्या पूर्वतयारीसाठी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आल्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले.

शिवसेनेचा पहिलाच पदाधिकारी मेळावा रविवारी (ता.२६) संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, केतन काजे, रमेश पवार, भरत राजपूत, शिल्पा वाडकर, नितीन पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री भुमरे म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यानंतर शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला. बाकीच्यांनी केवळ राजकारण केले. २० वर्ष खासदार राहिलेल्या खैरेंनी शहराचे वाटोळे केले. आम्ही मात्र कामे करून दाखवत आहोत. सर्वात जास्त निधी आपल्या जिल्ह्याला मिळवून दिला आहे.

यावेळी ठाकरे गटावर टीका करताना शिरसाट म्हणाले, आमची ३८ वर्ष शिवसेनेत गेली, पण काल आलेली ती अंधारे नावाची बाई आम्हाला शिकवते. ठाकरे गटाच्या नेत्यांना देखील या ताईंची आता अडचण व्हायला लागली आहे.

अंबादास दानवेने सांगितल्याचे ते म्हणाले. विधानसभेत ठाकरे गटाचे शिल्लक आमदार जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही, तालिका अध्यक्ष म्हणून मी हे पाहिले आहे. आधी मी मुंबईत थांबतो म्हणून टीक करणारे स्वतःच आता मुंबईत बसून असतात, असा टोला देखील शिरसाट यांनी अंबादास दानवेंना लगावला.

पाच एप्रिल रोजी आम्ही सगळे आमदार, मंत्री, जिल्हाप्रमुख आयोध्येला जाणार आहोत. तिकडून आल्यानंतर आपल्याला शहरातून न भूतो न भविष्यती अशी रॅली काढणार आहे. या शिवाय घराघरांवर छत्रपती संभाजीनगर लिहिलेले झेंडे लावण्याचा उपक्रम उद्यापासून हाती घेत आहोत, असेही शिरसाट यांनी सांगितले.

आमदार जैस्वाल म्हणाले, पक्षातील पदाधिकाऱ्यांनी वॉर्डावॉर्डातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा. टीका करणाऱ्यांवर लक्ष देवू नका. तर प्रास्ताविकात जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ खैरेंवर टीका करताना म्हणाले, शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर अनेकांना पोटशूळ उठला.

ज्या बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावावर इतक्या वर्ष पोटं भरली त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चात सहभागी व्हायची आता लाज वाटू लागली, अशा शब्दात जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी खैरे यांच्यावर टीका केली. हिंदुत्व म्हणणारे मोर्चात सहभागी न होता लपून बसले आहेत. त्यामुळे खैरेंनी आता स्वतःचे नाव चॉंद खैरोद्दीन करावे, अशी टीका जंजाळ यांनी केली.

नामांतराला राजकारणाचे रुप देवू नका

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, शहराच्या नामांतराला राजकारणाचे रुप देवू नका. जातीपातीचे राजकारण करून लोकांच्या भावना भडकविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. पहिले मुख्यमंत्री फक्त टीव्हीवर दिसायचे मात्र, आत्ताचे मुख्यमंत्री पहाटे तीन वाजता फोन केला तरी भेटतात.

सरकारने शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत १२ हजार कोटींची मदत दिली आहे. सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी गाव, शहर, तालुका आणि जिल्हा पातळीवर कार्यकारिणी जाहीर करा, शिवसेना कोणाची हा लोकांमधील संभ्रम दूर करा, असे आवाहन मंत्री सत्तार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT