cars  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : माथेफिरूने फोडल्या चार कार

कर्णपुऱ्यातील रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रकार

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मानसिक संतुलन बिघडलेल्‍या ३५ वर्षीय माथेफिरूने रस्त्याने जाणाऱ्या कारवर अचानक दगडांचा मारा केला. यात चार कारचे जवळपास पाच हजार रुपयांचे नुकसान झाले.

ही घटना बुधवारी (ता.१५) सकाळी कर्णपुऱ्यातील रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गॅस पंपाजवळ घडली. विशेष म्हणजे, चालकांनी कार थांबवून युवकाला बेदम चोप दिला. पोलिसांनी धाव घेत युवकाला ताब्यात घेतले. संजय मगन गांगे (वय ३५, रा. गल्ली क्रमांक २, मुकुंदवाडी) असे त्याचे नाव आहे.

यासंदर्भात वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बॅंकेचे शाखा व्यवस्थापक पराग मोहन गुजराती (वय ४५) यांनी तक्रार दिली की, बुधवारी (ता.१५) ते सकाळी दहादरम्यान (एमएच २०, जीई ४५९२) कारने महावीर चौकाकडून रेल्वेस्थानकाकडे जात असताना पदमपुरा भागातील कर्णपुरा परिसरातून जात असताना संजय याने अचानक कारवर दगड मारण्यास सुरवात केली.

राजाराम बाबूराव दिंडे (६२) यांच्याही कारचे नुकसान झाले. एकेक करत अशा चार कारवर संजयने दगड मारले. दरम्यान काही कारचालकांनी त्याला धरून चांगलाच चोप दिला. मात्र मारहाण होत असलेली पाहून राजाराम यांनी कसेबसे संजय याला वाचविले. सुदैवाने एकाही कारचालकाला मार लागला नाही.

या प्रकरणाची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल कंकाळ यांनी पथकासह धाव घेतली. त्याच वेळेस पोलिस अंमलदार स्वाती बनसोडे या पोलिस ठाण्यात जात असताना त्यांनीही धाव घेतली. याप्रकरणाची नोंद वेदांतनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT