Gunaratna Sadavarte sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar: ...प्रवृत्तींच्या लोकांची कबर समुद्रात नेऊन फेका; गुणरत्न सदावर्तेंचा रोख कोणाकडे

एसटी सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात ॲड. सदावर्ते रविवारी येथे आले होते

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेब, अजमल कसाब हे देशात कधीच प्रेरणा, वैचारिक स्थान होऊ शकत नाहीत. अमेरिकेच्या लष्कराने ओसामा बिन लादेन याचा मृतदेह मध्य समुद्रामध्ये फेकला होता. त्याचप्रमाणे अशा प्रवृत्तींच्या लोकांची कबरही समुद्रात नेऊन फेका, म्हणजे वारंवार कोणी या कबरीवर पुष्प अर्पण करणार नाही, अशा शब्दांत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोणाचेही नाव न घेता निशाणा साधला.

एसटी सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात ॲड. सदावर्ते रविवारी येथे आले होते. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, देशात सध्या सेक्युलर, रोखठोक अशा व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे देशातील नागरिकांची डोकी भडकविण्यात येत आहेत.

त्यामुळे ‘लव्ह जिहादपेक्षा व्हॉट्सॲप जिहाद भयंकर बनत चालला आहे. ओसामा बिन लादेन, दाऊद अशा विचारांची माणसे परदेशात बसून असे व्हॉट्सॲप ग्रुप चालवत आहेत. अशांचे देशात कोणाशी लागेबांधे आहेत, याची चौकशी करा.

एसटी बँकेचे ६४ हजार सदस्य असून त्यातील ४८ हजार मतदार हे एसटी कष्टकरी जनसंघाशी निगडित आहेत. यामुळे

वर्षानुवर्षे शरद पवार यांच्या विचारांशी संबंधित असलेली या बँकेतील व्यक्तींच्या म्हणजेच सावकारीविरुद्ध कष्टकरी अशी ही निवडणूक आहे. यासाठी एसटी कष्टकरी जनसंघ जनतेमध्ये आला असून आम्ही निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT