Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime news : मुलीने प्रसंगावधान राखत पळ काढला अन् ; पालकांनी धरून दिला चोप

जवाहरनगर भागातील एक १५ वर्षीय मुलगी तिच्या दोघी मैत्रिणींसोबत शिकवणीला जाताना

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शिकवणीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलींचा एका विकृताने सलग दोन-तीन दिवस पाठलाग केला, चौथ्या दिवशी चक्क मुलीचा हात पकडणाऱ्यापर्यंत त्याची मजल केली. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखत पळ काढला अन् घरी सांगितले. तिच्या कुटुंबीयांनी मंगळवारी शिक्षकांच्या मदतीने परिसरात त्याला जागीच पकडून चांगलाच चोप दिला. दरम्यान, जवाहरनगर पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्याची जमावाच्या तावडीतून सुटका करत ठाण्यात नेले. सागर मधुकर मैराळ (२८, रा. निंभोरा, ता. कन्नड, सध्या रा. सातारा परिसर) असे त्याचे नाव आहे.

जवाहरनगर भागातील एक १५ वर्षीय मुलगी तिच्या दोघी मैत्रिणींसोबत शिकवणीला जाताना एकजण आपला पाठलाग करत असल्याचे तिला शनिवारी जाणवले. सोमवारीही हाच प्रकार घडला. त्याने चक्क घरापर्यंत मुलीचा पाठलाग केला, त्यावेळी मात्र मुलींनी घरी सांगितले. मुलीच्या कुटुंबियांनी तिला धीर देत शिकवणीच्या शिक्षकांना कल्पना दिली आणि मंगळवारी त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे ठरले.

सागरने मंगळवारी पुन्हा मुलींचा पाठलाग सुरू केला. मुलींना आधीच धीर दिलेला असल्याने त्यांनी पायी चालणे सुरू ठेवले. त्याने त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताच शिक्षक रमेश तोर आणि अमोल कदम यांनी त्याला पकडले. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेत त्याला चोप दिला. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यकंटेश केंद्रे यांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिस हवालदार चंद्रकांत पोटे आणि मारुती गोरे यांना जाण्याचे आदेश दिले. दोघांनी जात सागरची जमावाच्या तावडीतून सुटका करुन ठाण्यात नेले. त्यानंतर केंद्रे यांनी मुलींशी संवाद साधून तीला देखील धीर दिला. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT