सोने  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : गुढीपाडव्यानिमित्त ; तीनशे कोटींची उलाढाल

अडीच हजार दुचाकींची डिलिव्हरी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त बुधवारी (ता.२२) बाजारपेठेत नवचैतन्य दिसून आले. या मुहूर्तावर साडेपाचशे चारचाकी, अडीच हजार दुचाकींची विक्री झाली, यात दोनशे ई- बाईकची विक्री झाली. तर पाचशे जणांनी गृहप्रवेश करीत तीनशे ते चारशे घरांची बुकिंग झालेली आहेत. सोने-चांदी खरेदीसाठीही मोठी गर्दी दिसून आली. एकूणच बाजारपेठेत तब्बल तीनशे कोटींची उलाढाल झाली.

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा मुहूर्त साधत बुधवारी बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तू खरेदीला गर्दी झाली होती. गुढीपाडव्याला घर, सोने-चांदी खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे या मुहूर्ताची अनेकजण वाट पाहत असतात.

पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत सकाळपासूनच बाजारात ग्राहकांची लगबग सुरू झाली. या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व असल्याने सोन्याची नाणी, दागिने खरेदीसाठी महिलावर्गाची सराफा बाजारात झुंबड उडाली. नवीन कपडे खरेदीसाठी कापड दुकानांमध्ये ग्राहकांची लगबग दिसून आली.

सराफा बाजारात दहा कोटींची उलाढाल

या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी झाली. दर वाढल्यामुळे सराफा मार्केटमध्ये दुपारी फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र सायंकाळी गर्दी वाढली. बुधवारी सोने ५९ हजार १०० रुपये तोळ्याने विक्री झाली. तर चांदी ६८ हजार रुपये किलोने विक्री झाली.

अवकाळी पावसामुळे अनेकांनी खरेदी करताना हात आखडता घेतल्याची माहिती लालचंद मंगलदास सोनीचे संचालक उदय सोनी यांनी सांगितले. यामुळे यंदा सरासरी उलाढाल झाली. यंदा दहा कोटींच्या घरात उलाढाल झाली असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

ऑटोमोबाईल क्षेत्रात बंपर उलाढाल

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आठवड्याभरापासून अनेकांनी बुकिंग करून ठेवली होती. बुधवारी (ता.२२) साडेपाचशे चारचाकी आणि अडीच हजार दुचाकींची विक्री झाली. यात विशेष करून ५० ई- कार तर २०० ई- मोपेड विक्री झाल्या आहेत.

दोन्ही मार्केट दरवर्षीप्रमाणे तेजीत होते. यासह यंदा वाहनांच्या किमती ५० हजारपासून ते दीड लाखापर्यंत वाढल्या आहेत. यात अनेक नामांकित कंपन्यांच्या वाहनांना तीन ते ८ महिन्यांचे वेटिंग आहे. यात आणखी विक्री वाढली असती मात्र अवकाळी पावसाचा परिणाम यंदाच्या विक्रीवर जाणवल्याचेही वाहन विक्रेते विकास वाळवेकर यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात तेजी

यंदा इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्येही मोठी तेजी दिसून आली. फ्रिज, वॉशिंग मशीन, एलईडीला सर्वाधिक मागणी होती. यात यंदा कुलरसाठी फारशी विचारणा कोणी केली नाही. एलईडी ३५ हजारापासून पुढे विक्री झाले. तर वॉशिंग मशीनमध्ये सात आणि आठ किलोचे मशीन हे ३५ ते चाळीस हजारात विक्री झाले.

२५ हजार रुपयांपासून मोठे फ्रीज विक्री झाले. यंदा २२ टक्के कॅशबॅक व इतर सवलतींचा फायदा ग्राहकांनी घेतला असल्याची माहिती अरुण इलेक्ट्रिकल्सचे पंकज अग्रवाल यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणात मोबाईलची मोठी विक्री झाली असून यात मार्केटमध्ये ३० कोटींची उलाढाल झाल्याचा विक्रेत्यांचा अंदाज आहे.

पाचशे जणांच्या घरांचे स्वप्न झाले पूर्ण

एक एप्रिलपासून नवीन घर खरेदीचे स्वप्न महागणार आहे. त्यामुळे यंदा गुढीपाडवा आणि नववर्षाचा मुहूर्त साधत शहरातील सर्वच बांधकाम व्यावसायिकांकडे पाचशेहून अधिक गृहप्रवेश झाले. तर तीनशे ते चारशे सदनिकांची बुकिंग झाली आहे. यात दीडशे कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT