Dense Forest esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : आता शहरात होणार ‘डेन्स फॉरेस्ट’

महापालिकेकडून ठिकठिकाणी जागांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या नगर वन योजनेतून महापालिका शहरात डेन्स फॉरेस्ट (घनदाट वृक्ष लागवड प्रकल्प) तयार केले जाणार आहेत. मात्र, योजनेतील अटीशर्तीनुसार जागेची अडचण लक्षात घेता जागांचा शोध सुरू आहे. शहरालगतच्या डोंगर रांगांमुळे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. या परिसरात हे डेन्स फॉरेस्ट (घनदाट वन क्षेत्र) विकसित होऊ शकते का, याविषयी चाचपणी सुरू आहे.

वृक्षतोडीमुळे शहरावरचे ग्रीन कव्हर कमी होत आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. तापमानात वाढ होत आहे. यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी शहरात हरित पट्टे विकसित करण्यात आले आहेत. तसेच उद्यानातही वृक्ष लागवडीवर भर देण्यात आला आहे.

दरम्यान, शासनाने सुरू केलेल्या नगर वन उद्यान योजनेचीही महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की, ही योजना राबविण्यासाठी तिच्या नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे.

त्यानुसार महापालिका उद्यान विभागाद्वारे नगर वन योजनेसाठी शहरात जागेचा शोध सुरू आहे. तथापि, शहराच्या मध्यवर्ती भागात जागा उपलब्ध नसल्याने शहरालगतच्या वसाहतींमध्ये जागेचा शोध घेण्यात येत आहे. यात उपलब्ध असलेल्या जागेत योजनेतून घनदाट वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Aries Money Horoscope 2026: मेष राशीचं भाग्य उजळणार! करिअरमध्ये मोठी प्रगती, 4 ग्रहांच्या युतीमुळे वाढणार धनलाभ

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Oppo New Mobile : ओप्पोचा ब्रँड मोबाईल भारतात लॉन्च! पण Oppo Find X9 5G की OnePlus 15 5G..कोणता आहे बेस्ट? पाहा संपूर्ण Review

SCROLL FOR NEXT