Sambhaji Nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar News : औट्रम घाटात जड वाहनांना बंदी; खंडपीठाचे आदेश, ११ ऑगस्टपासून अंमलबजावणी

ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्याचे आदेश Sambhaji Nagar Outram Ghat Ban on heavy vehicles effective from August 11

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव दरम्यानचा औट्रम घाट (कन्नड घाट) ११ ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी शुक्रवारी दिले. या वाहनांसाठी पर्यायी मार्गही खंडपीठाने सुचविला आहेत.

या संदर्भात ॲड. ज्ञानेश्वर बागूल, ॲड. नीलेश देसले, ॲड. श्रीकृष्ण चौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली होती. सुनावणी होऊन खंडपीठाने हे आदेश दिले. औट्रम घाटातून यापुढे फक्त दुचाकी, चारचाकी वाहने, राज्यातील आणि परराज्यातील महामंडळाच्या प्रवासी बस, खासगी आराम बस, आवश्यकता भासल्यास क्रेन, अग्निशमन दलाची वाहने, शेतीपयोगी ट्रॅक्टर, ॲम्ब्युलन्स, विशेष परिस्थितीत संरक्षक दलाची वाहने यांनाच वाहतुकीसाठी परवानगी असेल.

बंदी घातलेल्यांत जड वाहने, ट्रक, ट्रेलर, पेट्रोल- डिझेल वाहतूक करणारे टँकर, दुधाचे टँकर आदींचा समावेश आहे. या वाहनांसाठी छत्रपती संभाजीनगर- दौलताबाद टी पॉइंट- देवगाव रंगारी- शिऊर बंगला- वाकळा- पिंपरखेड- न्यायडोंगरी मार्गे चाळीसगाव हा मार्ग सुचविण्यात आला आहे.

औट्रम घाटात दुरुस्तीला परवानगी देतानाच गौताळा अभयारण्यातून जाणाऱ्या गौताळा घाटाच्या दुरुस्ती व इतर कामांना प्रतिबंध करण्यात आला आहे. या घाटातून जड वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध केल्याने टोलचे नुकसान होईल, असा मुद्दा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी मांडला.

घाटातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांचे होणारे हाल, घाटात घडणारे गुन्हे आदींचा संदर्भ देत खंडपीठाने त्यांचे म्हणणे फेटाळले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर, जळगाव येथील आरटीओ, दोन्ही ठिकाणे पोलिस अधिक्षक, चाळीसगावच्या पोलिस उपाधिक्षकांना देण्यात आले. पुढील सुनावणी ३१ ऑगस्टला होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Alert : पुण्यात 'कोल्ड्रिफ' कफ सिरपचे वितरण नाही; नागरिकांनी काळजी करू नये, एफडीए

Heart Attack Case Kolhapur : हर्ट अटॅकला वय राहिलं नाही, २४ वर्षीय सोहम मित्रांसोबत फिरायला गेला अन् घरी परतलाच नाही

माेठी बातमी! 'स्टार फार्मा वितरकाकडून डिलाईफ सिरपच्या २०० बॉटल जप्त'; औषध प्रशासनाची कारवाई, शासनाने काय आदेश दिले?

Buddhist Community : 'आता बौद्ध धर्म स्वीकारलेल्यांनाही मिळणार अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र'; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे आदेशात?

Sanju Samson: संघासाठी ९व्या क्रमांकावरही फलंदाजी करेन, प्रसंगी...! संजू हसनू बोलला, पण त्याच्या व्यथा डोळ्यांतून जाणवल्या Video

SCROLL FOR NEXT