Maratha Morcha Aandolan Sakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Morcha Aandolan: जालना येथील हल्ल्याच्या निषेधार्थ, पाचोड परिसरात ठिकठिकाणी आंदोलनकर्ते आक्रमक

राज ठाकरे वाहनातून खाली उतरले व मुख्यमंत्र्यांची भेट आरक्षणाबाबत चर्चा करतो असे आश्वासन दिले. तेव्हा ग्रामस्थांनी वाहनाला वाट मोकळी करून दिली.

सकाळ वृत्तसेवा

पाचोड - अंतरवाली सराटी (जालना) येथील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.४) पाचोड परिसरात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा आला असता आंदोलनकर्त्यांनी तो थांबविल्याची घटना घडली.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा (ता.पैठण) फाट्यावर सोमवारी सकाळी साडेआठ वाजता मुरमासह कोळीबोडखा व अन्य गाव च्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मंडलाधिकारी जयकुमार केकाण, तलाठी सीमा राजाळे,अनुया कावळे, अनंत शिंदे व पाचोडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी निवेदन स्वीकारले.

त्यानंतर आडगाव जावळे (ता.पैठण) येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी साडेनऊ वाजता रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा आंदोलन करणाऱ्यांनी अडविला. त्यानंतर राज ठाकरे वाहनातून खाली उतरले व मुख्यमंत्र्यांची भेट आरक्षणाबाबत चर्चा करतो असे आश्वासन दिले. तेव्हा ग्रामस्थांनी वाहनाला वाट मोकळी करून दिली.

दरम्यान पाचोड - पैठण रस्त्यावरील दादेगाव - हर्षी फाट्यावर हर्षी, सोनवाडी, वाघवाडी, दादेगाव येथील सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडलाधिकारी जयकुमार केकाण, तलाठी अनंत शिंदे, अनुया कावळे,पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवाल यांनी निवेदन स्वीकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

Cyber Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहीतेचा छळ; संग्रामपूरमध्ये धक्कादायक प्रकार

"आम्हाला आतातरी मूल नकोय" शुभविवाह फेम अभिनेत्रीचा खुलासा; कारण सांगताना म्हणाली..

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT