suicide youth  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : कंपनीत जातो म्हणत घराबाहेर पडला अन् घेतली विहिरीत उडी

खासगी कंपनीत काम करणाऱ्या २० वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

राजेश नागरे

छत्रपती संभाजीनगर : खासगी कंपनीत काम करणाऱ्या २० वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी (ता.२८) रात्री नऊदरम्यान शरणापूर परिसरात समोर आला. विजय आप्पासाहेब उभेदळ (२० रा. वडगाव कोल्हाटी परिसर) असे त्या मृत कामगाराचे नाव असल्याची माहिती दौलताबाद पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, विजय हा मंगळवारी रात्रपाळीचे काम असल्याचे सांगत घराबाहेर पडला होता. बुधवारी दिवसभर तो नंतर घरी गेलाच नाही. दरम्यान बुधवारी रात्री नऊदरम्यान शरणापूर शिवारातील गट क्र. १३ येथील एका विहिरीत मृतदेह आढळल्याचे समोर आले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी तो मृतदेह विजयचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेह काढून घाटीत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. विजय हा रागीट स्वभावाचा होता, किरकोळ वादातून त्याने रागाच्या भरात याआधीही घर सोडले होते अशी माहिती विजयचे वडील अप्पासाहेब उभेदळ यांनी दिली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांत नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक विठ्ठल सर्जेराव खंडागळे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT