Sambhaji Nagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : सिल्लोडमध्ये एकाच रात्री तीन घरे फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास,सीसीटीव्हीत चोरटे कैद

याप्रकरणी गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

सिल्लोड - अज्ञात चोरट्यांनी शहरालगतच्या भराडी रस्त्यावरील रामा पार्क परिसरातील तीन कुलूपबंद घरांना लक्ष करीत लाखोंचे सोने, चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना गुरुवारी (ता.१७) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार संदीप एकनाथ चंद्रे (रा.रामापार्क, सिल्लोड) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमुद केले की, १० ऑगस्ट रोजी सासऱ्याचे निधन झाल्याने ते कुटुंबीयांसह सावखेडा (ता.सिल्लोड) येथे गेले होते. गुरुवारी (ता.१७) शेजाऱ्यांनी फोन करून घटनेची माहिती दिली. सिल्लोड येथे आल्यानंतर पोलिसांनी माहिती दिली.

सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बी. व्ही. झिंजुर्डे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घराची पाहणी केली असता चोरट्यांनी कपाट तोडून दागिणे लंपास केल्याचे दिसून आले.

याच पद्धतीने परिसरातील गणेश परदेसी (रा.सावखेडा (ता.पाचोरा) यांचे रामापार्क परिसरातील घराचे कुलूप तोडून दागिणे लंपास केल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर सुनील चौधर यांनी देखिल घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३२ ग्रामचा पोहेहार, ७ ग्राम सोन्याची अंगठी, ५ ग्राम अंगठीसह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

Rajapur Muncipal :. इतिहासाचा प्रवास; राजापूर पालिकेच्या १५० वर्षांची गाथा, ब्रिटिश काळाचा ठसा

SCROLL FOR NEXT