हायवा ट्रक sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : वाळूच्या हायवाने एकाला चिरडले

वाळूज औद्योगिक वसाहतीतील घटना

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : वाळूची अवैध वाहतूक करीत असलेल्या विनाक्रमांकाच्या हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. हा अपघात वाळूज औद्योगिक वसाहतीतील एनआरबी चौक ते वडगाव (को.) रोडवर शुक्रवारी (ता.१०) सकाळी १०.३० च्या सुमारास झाला.

वडगाव(को.) येथील प्रल्हाद पुंजाजी बारसे (वय ५०) हे वाळूज औद्योगिक वसाहतीतील एनआरबी चौकातून वडगाव (को.)कडे दुचाकी (एम एच २०,सी व्ही-७९९४) वरून येत असताना मोकाट जनावरे आडवी आली. त्यामुळे बारसे हे दुचाकीवरून खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या हायवाने बारसे यांना चिरडले. अपघातात त्यांचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत बारसे यांचा मृतदेह घाटीत रवाना करून वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक ताब्यात घेतला.

अपघातातील हायवा ट्रकची अदलाबदली?

अपघातानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांसह काही पत्रकारही अपघातस्थळी आले. त्यांनी अपघातग्रस्त हायवाचे व त्यामधील वाळूतून गळणाऱ्या पाण्याचे फोटो व व्हिडिओ चित्रण केले. मात्र, पोलिसांनी या अपघातातील अवैध वाळू वाहतूक करणारा विना

नंबरचा हायवा ट्रक बदलून त्याऐवजी डांबर वाहतूक करणारा व (एम एच ४६, बी बी -४०४७) हा क्रमांक असलेला हायवा ट्रक पोलिस ठाण्यात आणून उभा केला, अशी चर्चा वाळूज परिसरात दिवसभर होत होती. याविषयी पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

'मेल्यानंतर तरी मला न्याय द्या' अभिनेत्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत केले गंभीर आरोप, जीवन मृत्यूंशी देतेय झुंज

Assembly lobby clash Video: मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

Latest Marathi News Updates : स्वातंत्र्यानंतर प्रथमच सावित्रीच्या लेकीसाठी धावणार लालपरी

R Madhavan Fitness Secrets: 55 व्या वर्षीही 'जोश' कायम! आर. माधवनचं तरुण दिसण्याचं हे आहे 'अस्सल' सिक्रेट

SCROLL FOR NEXT