Sambhaji Nagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : पोलिसांसाठी जास्तीचा निधी देऊ ; संदीपान भुमरे

पोलिस वसाहत व ‘एसडीएम’ कार्यालय इमारत बांधकामाचे भूमिपूजन

सकाळ डिजिटल टीम

वैजापूर - पोलिसांसाठी आवश्यक असणारी वाहने, ड्रोन कॅमेरा, पोलिस वसाहत यासाठी- जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करु. तालुक्यातील वीरगाव, शिऊर या पोलिस ठाण्यासाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास महामंडळामार्फत निधी देण्यात येईल, असे आश्वासन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिले.

वैजापूर येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता पोलिस वसाहत व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या नविन इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन भुमरे यांच्याहस्ते शुक्रवारी (ता.११) झाले.

या कामासाठी जवळपास २२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भूमीपूजन झाल्यानंतर कवायत मैदानावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भुमरे बोलत होते. कार्यक्रमाला आमदार रमेश बोरनारे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी व पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, भुमरे यांनी अनेक किस्से सांगितल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष साबेर खान, बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, तहसीलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी हणमंत बोयनर, मुख्याधिकारी भागवत बिघोत यांची उपस्थिती होती. प्रशांत गीते यांनी सूत्रसंचालन केले. महक स्वामी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT