Samriddhi Highway Accident Esakal
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू; तर २३ जण जखमी, मृतांमध्ये बालकांचाही समावेश

समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताचे सत्र सुरूच आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मोबीन खान

वैजापूर : सैलानीबाबा दर्गाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता.१४) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्यानजीक घडली. भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 जण जागीच ठार 20 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये पाच पुरुषांसह एक मुलगी व सहा महिलांचा समावेश आहे. मृत व जखमी हे सर्व नाशिक येथील रहिवासी आहेत.

सैलानी येथील दर्गावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात मृतांमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून हे प्रवासी पुन्हा नाशिककडे परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत सुरू केली. जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिस आधिक तपास करत आहेत.

अपघातातील जखमींची नावे अशी

धोरट ( 60 रा. वैजापूर, पूर्ण नाव माहीत नाही), संगीता म्हस्के (50 रा. नाशिक ). गौतम भास्कर तपासे (38 पाथर्डी), संदीप रघुनाथ अस्वले, कार्तिक ( 5 रा. नाशिक), सोनाली त्रिभुवन, गिरजेश्वरी संदीप अस्वले, लखन शंकर सुरसे, शांताबाई नामदेव म्हस्के, तन्मय लक्ष्मण कांबळे, युवराज विलास साबळे, धनश्री लखन सोळसे, कमलेश दगडू म्हस्के, सम्राट दीपक केकाणे, श्रीहरी दीपक केकाणे, संदेश संदीप अस्वले, प्रकाश हरी गांगुर्डे, अनिल लहानू साबळे, दगू सुखदेव म्हस्के (सर्व रा. नाशिक )

रुग्णवाहिकेतून मृत व जखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करीत असताना नातेवाईक, लहान मुलांच्या किंकाळ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात भयावह परिस्थिती निर्माण झाली. नातेवाईक मोठमोठ्याने रडून आक्रोश करीत होते. यातील एका लहान मुलाने आपले आईवडील गमावल्याची माहिती समोर आली असून तो हमसून हमसून रडत होता. या अपघातात काहींना डोक्यात, हात, पोटाला गंभीर दुखापत तर काहींचे हातपाय फ्रॅक्चर झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT