Samruddhi Mahamarg Accident  sakal
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वर ३ दिवसांत तिसरा अपघात; कार कोसळून पतीचा मृत्यू, पत्नी मुलगा जखमी

समृद्धीवरून खाली कोसळल्याने कार मधील एकाचा मृत्यू, २ जखमी

सकाळ वृत्तसेवा

करमाड : समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगाने जालन्याकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रोडच्या खाली जाऊन कारमधील पतीचा जागीच मृत्यू , तर पत्नी व लहान मुलगा जखमी झाला.

हा अपघात समृद्धी महामार्गावरील करमाड पोलीस ठाणे हद्दीतील जयपूर-भांबर्डा शिवारात सोमवारी (ता.तीन) पहाटे तीन वाजता घडला.सुशीलकुमार दिलीप थोरात (43, रा. मालेगाव जि. वाशिम) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.

श्री. थोरात हे एमएच 30 बी बी 9793 या क्रमांकाच्या चार चाकीने पत्नी व लहान मुलांसह मालेगाव येथून जालन्याच्या दिशेकडे जात असताना हा अपघात घडला. संभाजीनगर तालुक्यातील जयपूर-भांबर्डा शिवारात पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांची

कार आली असता श्री. थोरात यांचा भरधाव वाहनावरील ताबा सुटला. यात कार महामार्गाच्या डाव्या बाजूला जवळपास 30 फूट खोल जाऊन अगदी एखादा कागद उडावा अशी जाऊन कोसळली. यात सुशीलकुमार थोरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताच्या आवाजाने भांबर्डा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन करमाड पोलिसांना कळवत जखमींना बाहेर काढले. जखमी पत्नी व लहान बालकास (वय समजू शकले नाही) करमाड पोलीस ठाण्याचे बीट जमादार सुनील गोरे, दादासाहेब ढवळे यांनी उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवले आहे. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करमाड पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT