sandipan bhumare sandipan bhumare
छत्रपती संभाजीनगर

'खते, बियाणे कमी पडू देणार नाही', मंत्री संदीपान भुमरेंची जायकवाडीत खरीप आढावा बैठक

खरीप हंगाम २०२१-२२ नियोजन व आढावा बैठक रविवारी पार पडली

गजानन आवारे

जायकवाडी (औरंगाबाद): पैठण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची खरीप हंगाम बैठक कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumare) यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी मंत्री भुमरे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खत, बियाणे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

खरीप हंगाम २०२१-२२ नियोजन व आढावा बैठक रविवारी पार पडली. सदरील बैठक ऑनलाईन असून सुद्धा अडीचशे ते तीनशे शेतकरी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी तालुक्यातील रासायनिक खत मागणी व पुरवठा बाबत आढावा घेण्यात आला. यावेळी भुमरेंनी शेतकऱ्यांना दर्जेदार व रास्त भावात खत पुरवठा करावे, असे निर्देश विक्रेते व यंत्रणेला दिले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी कृषी विभागाकडून खरीप हंगामात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी सादरीकरण केले. याप्रसंगी बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल हातगावकर यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती अशोक भवर, उपसभापती कृष्णाजी भुमरे, गट विकास अधिकारी बागूल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मंडळ कृषी अधिकारी किशोर पाडळे, नंदकिशोर थोरे, रामनाथ कारले, विशाल साळवे, योगेश सोनवणे, सुहास धस, कृषी अधिकारी विकास पाटील, विस्तार अधिकारी शेषराव चांदणे, चोंधे, यशवंत चौधरी, राजू गावडे सहआदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT