Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

इतके बळी घेणारा हा 'सारी' आजार आहे तरी काय...

मनोज साखरे

औरंगाबाद : कोरोनाच्या स्थितीत जिल्ह्यात ‘सारी’ (सिव्हियर ऑक्युट रेस्पायरेटरी इन्फेक्शन) आजारामुळे अकरा बळी गेले. त्यामुळे अनेकांनी कोरोनासह सारीचीही धास्ती घेतली आहे; पण घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोना आणि सारीची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. हा आजार आधीपासूनच आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. 

सारीबद्दल औरंगाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, ‘‘सारीग्रस्त व्यक्तीची श्वासोच्छश्‍वास घेण्याची गती अर्थात रेस्पारेशन रेट ४५ प्रती मिनिट असते. श्वास घेताना हा पेशंट धापा टाकतो. एखादा श्वान जीभ काढून जशा धापा टाकतो अगदी तशाच धापा हा रुग्ण श्वास घेताना टाकतो. या मुख्य लक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे असते. व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेकशन हे सारीचे मूळ आहे. हा आजाराची सुरवात होताना आपले शरीर आपणास जागे करते. त्यावेळी आपण अंगावर आजार काढला की हा त्रास सुरू होतो. थोडक्यात कोणतेही लक्षणे अंगावर काढू नये. दुखणे अंगावर काढणे, मनानेच उपचार घेणे कधी आयुर्वेदिक तर कधी होमिओपॅथी घेतली जातात तर कधी बऱ्याचदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलवरून औषधी घेतली जाते, ही पद्धती बदलण्याची गरज आहे.’’ 

सारीची लक्षणे 

  • वयोवृद्ध, बालके व रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्यांना सारी लवकर होतो. 
  • श्वास घ्यायला खूप त्रास होणे, खूप ताप, सर्दी, खोकला लागणे. 
  • फुप्फुसांत सूज येणे, कमी काळात पेशंट सिरियस होणे. 

दोन्हींची लक्षणे सारखीच 

कोरोनाचा संशयित रुग्ण पुढच्या स्टेजमध्ये आला, की एकदम सुरवातीचे लक्षण जसे खोकला, ताप असते. त्यावेळी आपण अशा रुग्णाची कोरोना आहे की नाही टेस्ट करतो, स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत पाठवतो; पण काही रुग्ण ट्रेमण्डस स्टेजला आले तेव्हा ते रुग्ण व सारी रुग्ण सारखेच वाटतात. 

आधीही सारी होताच 

सारीचे रुग्ण आतापासून नाहीत. डेंगी, स्वाइन फ्लूसारखाचे बऱ्याच वर्षांपासून सारीचे रुग्ण आहेत. स्वाइन फ्लू, डेंगी होता तेव्हाही सारी होता. सारीने दरवर्षी मृत्यू होतात; पण कोरोना व सारीची लक्षणे सारखीच असल्याने आता सारीकडे विशेषतः लक्ष देणे आवश्यक आहे. कारण कोणताही कोरोनाचा रुग्ण मिस व्हायला नको, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. 

म्हणून सारीकडे लक्ष देण्याची गरज 

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘कोरोनामुळे सारीकडे लोकांचे लक्ष गेले व सारीकडे लक्ष गेल्याने त्यातून होणाऱ्या मृत्यूकडे लोकांचे लक्ष गेले. त्यामुळे सारीबद्दल जागरूकता वाढली. जी आधी अनास्थाही होती; पण चुकून समजा सारीचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला तर मग मात्र त्या रुग्णाला कोरोना आहे असे स्पष्ट होते. मग त्या रुग्णाच्या आजूबाजूला चारही दिशेने तीन किलोमीटरपर्यंत घराची तपासणी करून कोरोनाची लागण झाली की नाही यासाठी सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. म्हणूनच आपल्याला सारीकडे लक्ष द्यावे लागेल.’’ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Marathi News Live Updates : जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य, ऐन सणासुदीत असं... : मंत्री चंद्रकांत पाटील

Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

SCROLL FOR NEXT