Aurangabad City news 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनानंतर सारीचा धोका : औरंगाबादेत एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महापालिका यंत्रणा कामाला लागलेली असतानाच आता सारी या नव्या आजाराने यंत्रणेची झोप उडाली आहे. कोरोना सारखीच लक्षणे असलेल्या सारीच्या (सिव्हिअरली ॲक्युट रेस्पायरेटरी इलनेस) आजाराने मंगळवारी (ता. २४) एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकास्तरावर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने केलेल्या सूचनानुसार महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष ठेऊन आहेत. शहरात येणारे परदेशी नागरिकांसह, इतर शहरातून आलेल्या प्रवाशांची महापालिकास्तरावर तपासणी केली जात आहे. एकीकडे कोरोना रोखण्यासाठी तयारी सुरू असताना दुसरीकडे सारी या आजाराने एकाचा मृत्यू झाला आहे. या आजाराची लक्षणे सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनासारखीच असून, दोन दिवसांतच रुग्णांची तब्येत चिंताजनक होते व त्यातच त्याचे निधन होते. मंगळवारी एका तरुणाचा सारीने बळी घेतला. त्यामुळे शहरातून कोरोना व्हायरस हद्दपार झाला असे म्हणता येणार नाही. असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. 

हेही वाचा- होम क्वारंटाईन असलेल्यांच्या घरासमोर लागणार फलक

खासगी रुग्णालयाकडून मागविली माहिती 
सारीसंदर्भात माहिती मिळताच अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती खासगी रुग्णालयांकडून मागविण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका सतर्क आहेच, असे श्रीमती पाडळकर यांनी सांगितले. 
 
१७ हजार जणांची तपासणी 
शहरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांवर महापालिकेतर्फे प्रवाशांची स्क्रीनिंग केली जात आहे. चोवीस तासांत १६ हजार ९२८ जणांची तपासणी करण्यात आली असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे असले तरी सोमवारी (ता. २३) दुपारी दोन ते मंगळवारी दुपारी दोनपर्यंत तब्बल १६ हजार प्रवाशांची तपासणी झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT