Sark-varzadi-wadkha forest department Fire in Varazdi forest auranganad sakal
छत्रपती संभाजीनगर

वरझडी डोंगर शिवारात आग

औरंगाबाद तालुक्यात हजारो एकरांतील वनसंपदा जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

करमाड : औरंगाबाद तालुक्यातील वनविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या आडगाव सरक-वरझडी-वडखा शिवारातील भल्या डोंगरावर गुरुवारी (ता.७) दुपारच्या सुमारास आग लागून हजारो एकरातील वनसंपदा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वप्रथम आडगाव शिवारातील डोंगरावर हा वणवा पेटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पसरत जाणारी आग, रखरखते ऊन व वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे ही आग वडखा नंतर वरझडी शिवारातील डोंगरावर पोहोचल्याने यात हजारो वनझाडांची राखरांगोळी झाली. सोबतच लहान झुडपे, लहान सरपटणारे प्राणी, लहान पशू व पक्षांनाही या आगीने मोठे हानी पोहोचली. वडखा शिवारात तर डोंगर पायथ्याशी असलेल्या खासगी जमिनीतील शेतकऱ्यांचेही काही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत वनविभागाच्या पंचनाम्यानंतरच खरे काय ते कळू शकेल. सोमनाथ साबळे यांची वडखा शिवारात या डोंगर पायथ्याशी गट नंबर १२ मध्ये शेती आहे. यातच १००×१०० आकाराचे शेततळे आहे. दुपारी दोन वाजता या शेततळ्याच्या अगदी पंधरा फूट अंतरावर ही आग पोहोचली होती. दरम्यान, साबळे कुटुंबातील सर्व सदस्यांसह शेजाऱ्यांनी झाडा-झुडप्यांच्या प्रयत्नातून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. गेल्या १७ मार्च रोजी शेंद्रा एमआयडीसीच्या पूर्वेकडील शेंद्रा बन शिवारातील डोंगराला मोठी आग लागली होती. यावेळी सुमारे ३५ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातील वनसंपदा राख झाली होती. वनविभागाने इको बटालियनला ४ वर्षांपूर्वी झाडे लावण्यासाठी हा डोंगर उपलब्ध करून दिला होता. दरम्यान अजूनही वनविभागाला ही आग लागली व लावली गेली होती याचा तपास लावण्यात यश आलेले नाही. याच डोंगराला पाच दिवसानंतर पुन्हा २१ मार्च रोजी आग लागली होती. तेव्हाही या डोंगररांगेतील किमान दहा हजारांपेक्षा अधिक वनसंपदेसह पशू, पक्ष्यांची घरटी खाक झाली होती. त्यावेळी इको बटालियनच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते.

भविष्यात आग लागून मोठे नुकसान पोहोचू नये यासाठी फायर लाईन म्हणजे चर मारण्याचे काम सुरू असतानाच ही आग वाढली आणि हेक्टर एकरातील कुरण आगीत भस्मसात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. परंतु वनविभाग व इको बटालियनने याला चुकीचे ठरविले होते. मात्र, या दोन्हीही आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ते स्वतः घटनास्थळी असल्याचे सांगितले. मात्र, अधिक माहिती देण्याचे अप्रत्यक्षरीत्या टाळत ही आग फक्त वरझडी शिवारात असून ती रात्रीच्या वेळेत सर्वत्र पसरल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

महिन्यातील तिसरी घटना

वनविभागाने रात्री साडेआठपर्यंत या आगीवर बर्यापैकी यश मिळविले. तरीही रात्री उशिरापर्यंत ही आग पूर्णपणे अटोक्यात आणण्यात यश आले नव्हते. तत्पूर्वी हजारो एकरावरील वनसंपदेसह पशू-पक्ष्यांची घरटी या आगीत जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील एक महिन्याच्या आतील ही तालुक्याच्या याच भागातील ही तिसरी आग ठरल्याने वनविभागाच्या सुरक्षेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT