छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी सतीश चव्हाण अजित पवार गटयांतील पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकरतून महायुतीसह पक्षाला घरचा आहेर दिला. आचारसंहिता लागू होताच मंगळवारी (ता. १५) रात्री उशिरा त्यांनी एक प्रसिद्धीक जारी करत मनातील खदखद व्यक्त केली.
इतकेय नव्हे, तर गंगापूर मतदारसंघातून जोरदार तयारी सुरू केल्याने चव्हाण यांना तिकिटाचा पत्ता कट होण्याची कुणकुण लागल्याने त्यांनी हा घरचा आहेर दिला की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे आमदार चव्हाण यांनी पत्रकात महटले, की जवळपास दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षगाच्या प्रश्नावर सरकार मार्ग कावेल, अशी अपेक्षा होती. परंतु, सरकार बहुजनांचे प्रश्न सोडवु शकले नाहीत .
दरम्यान, आमदार चव्हाण यांना तिकीट मिळणार नसल्याची कुणकुण लागताच त्यांनी मराता आरक्षणाकडे मोर्चा वळविल्याचे पत्रकातून दिसते. पत्रकात म्हटल्यानुसार, मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्यावर्षी वाशी येथे मोर्चा बडकल्यानंतर राज्य सरकारने जरांगे यांची भेट घेऊन ५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा आरक्षण देणार, सगेसोयरे प्रमाणपत्र देणार अशा मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, त्यानंतर मराठा आंदोलनाचा प्रश्न हाताळण्यात सरकारला यश आले नाही.
मुस्लिम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाकडेदेखील या सरकारने सकारात्मकपणे पाहिले नाही, असा आरोपही आमदार चव्हाण यांनी केला आहे. यातून ते पक्ष सोडणार का, याविषयी चर्चा होत आहे. असे असले तरी या वर्षभरात आमदार चव्हाण यांनी यावर 'ब्र' शब्दही का काढला नाहीं, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, मागील एक ते दीड महिन्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पुन्हा जाण्यासाठी चाचपणी केली; परंतु त्यांचे परतीचे दोर कापल्याच्या चर्चेला उधान आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.