अत्याचार sakal
छत्रपती संभाजीनगर

Kidnapping : 'ती' घरात एकटी होती, तोंडाला रूमाल बांधून त्याने गाडीवरून केलं अपहरण अन्...

तू बाहेर ये आपण फिरायला जाऊ... असं म्हणाला पण मनात वेगळंच होतं

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : घरात एकटी पाहून अल्पवयीन मुलीला तू बाहेर ये असे म्हणत आपण फिरायला जाऊ असे सांगून पिडीतेला दुचाकीवर बसवून एकाने अपहरण केल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास निंबायती(ता.सोयगाव) येथे घडली. याप्रकरणी बुधवारी पीडितेच्या पित्याने सोयगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर सोनाजी जाधव (वय २२) असे अपहरण प्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सोयगाव पोलिसांनी सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर केले असता त्याला २६ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश अनमोल इंगोले यांनी दिले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निंबायती येथील अल्पवयीन मुलगी एकटी घरात असल्याचा फायदा घेत सागर जाधव हा घरी गेला व तिच्या तोंडाला रुमाल बांधून अपहरण केले.

आरोपीने पीडित मुलीला तिडका मार्गाने मनुदेवी येथे घेऊन जाऊन आपण लग्न करू असे सांगितले. दरम्यान पीडितेने यास नकार देताच आपण दोघेही मरून जाऊ असे सांगून तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे पिडीतेने सोयगाव पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

दरम्यान, पीडितेला सिल्लोड येथे घेऊन गेला असता त्यास सिल्लोड शहरात पकडून सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. बुधवारी पीडितेच्या जबाबावरून व तिच्या पित्याच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोयगावचे पोलिस निरीक्षक अनमोल केदार, जामदार राजू बर्डे, रवींद्र तायडे, अजय कोळी हे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT