sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : कवडीमोल दराने कापूस विक्री

विक्रीतून खर्चही निघेना : शेतकरी झाला हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

अंधारी : परिसरात कपाशीचे भाव गडगडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कवडीमोल दराने कापूस विक्री करण्याची वेळ आली आहे. कापूस विक्रीतून कपाशी लागवडीवर झालेला खर्च निघत नसल्याने शेतकरी चांगले आर्थिक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

यंदा पावसाने दगा फटका दिला. त्यामुळे शेतातील कपाशी, मका, ही पिके म्हणावी तशी आली नाहीत. त्यातच कपाशीची वाढ खुंटली. त्यामुळे कपाशीच्या झाडांना कैऱ्या कमी लागल्या. त्यात तीन ते चार वेचणीत कपाशीच्या पऱ्हाट्या झाल्या

तर मका पिकांची ही तशीच अवस्था झाली. मकाला ऐन कणसे लागण्याच्या वेळेसच पावसान पाठ फिरवली. त्यामुळे मकालाही पुरेसे कणसे लागली नाहीत. त्यामुळे ही मका जनावरांसाठी कुट्टी म्हणून वापरावी लागली.

त्यातच अशा विपरित परिस्थितीत सापडलेले शेतकरी चांगलेच अडचणीत आले. आजघडीला कापूस व्यापाऱ्यांकडून ५२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. परंतु कपाशी लागवड, वेचणीवर झालेला खर्च पहाता आणि घटलेले उत्पादन लक्षात घेता यातून कपाशी लागवडीचा खर्चही निघणे अवघड झाले आहे.

त्यातच उसनवारी करून कापूस लागवडीसाठी घेतलेल्या पैशांचा तगादा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव बेभावाने कापूस विक्री करावा लागत आहे.

तोट्याचा ताळेबंद

शेतकऱ्यांना कपाशी लागवडीचा एकरी खर्च २१ हजार ५०० रुपये अंदाजे आला आहे. सरासरी उत्पादकता एकरी दहा क्‍विंटल व सहा हजार रुपयांचा दर अपेक्षित धरता ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्यास एकरी अवघे १९ हजार ६०० रुपयांचे उत्पन्न होईल. या वर्षी उत्पादकता अवघी चार ते पाच क्‍विंटलवर पोचली. परंतु खर्च तेवढाच असल्याने शेतकऱ्यांना उधारी उसनवारी फेडण्यासाठी घरून पैशाची सोय करावी लागत आहे.

शासनाचे निर्णय अयोग्य असून याचे परिणाम सर्वत्र दिसत आहेत. त्याचा फटका सर्वांनाच बसला आहे. कापूस खरेदीचा उत्साह मावळला आहे. भाव कोसळल्याने शेतकऱ्यांची मानसिक स्थिती बिघडल्याचे चित्र आहे. जास्त भावात खरेदी केलेला कापूस कमी भावात विकता येत नसल्याने व्यापारी त्रस्त आहेत.

-दिगंबर तायडे, कापूस व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार

SCROLL FOR NEXT