छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत १० ते १८ ऑगस्ट दरम्यान सेरो सर्वेक्षण 

शेखलाल शेख


औरंगाबादः शहरात १० ते १८ ऑगस्ट दरम्यान सेरो सर्वेक्षण होणार असून शहर आणि वाळुज अशी विभागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या प्रादुर्भावाच्या अटकाव करीता तसेच त्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत व्हावी यादृष्टीने आय.सी.एम.आर. च्या नियमावलीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने ‘सेरो’ सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गुरुवार (ता.६) केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड-१९ आजाराच्या अनुषंगाने ऐन्टीबॉडीज तपासणीच्या दृष्टीने सेरो सर्वेक्षणाबाबतच्या नियोजनाबाबत बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. 

बैठकीत महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जनऔषध व वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. जगन्नाथ दिक्षित, सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती बजाज, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद, जिपचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, एमजीएमच्या औषध विभाग प्रमुख डॉ. शोभा साळवे यांची उपस्थिती होती.

शहर आणि वाळुज अशी विभागणी 

शहरात १० ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान सेरो सर्वेक्षण होणार असून १० ते १५ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद शहर तर १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान अनुक्रमे बजाजनगर आणि वाळूज महानगर अशी विभागणी करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण दररोज २० ते २५ वार्डांमध्ये करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण डॉ.मुजीब सय्यद, डॉ.जगन्नाथ दिक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर शरीरात विकसित होत असलेल्या ॲन्टीबॉडीज तपासण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करून निवडक चाचण्या करण्यात येणार आहेत. 

शहर आणि ग्रामीण भागात रक्ताचे नमुने घेणार 

शहरात ४२३५ तर ग्रामीण भागात १८०० ते २००० नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार असून ही चाचणी अत्यंत साधी असून नागरिकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. ज्याप्रमाणे आपण रक्त तपासणी करतो त्याचप्रमाणे ही चाचणी होणार असल्याने नागरिकांनी सर्वेक्षणकर्त्यास सहकार्य करावे. हे सर्वेक्षण अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असून याकरीता नागरिकांना एक साधा कन्सेंन्ट फॉर्म भरून द्यावयाचा आहे.

या तपासणीसाठी रँडम सॅम्पलिंग पद्धतीने घटकांची निवड करण्यात येऊन शारत्रोक्त पद्धतीने तपासणीसह अभ्यास करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी लागणारे सॅम्पल जिल्हा परिषद, महानगरपालिका एकत्रित करुन प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठवणार आहे. 

महापालिका आयुक्त पांडेय यांनी सांगितले की, शहरातील ११५ वॉर्डमध्ये पथके तैनात करुन वेळेत सॅम्पल गोळा करुन शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. या तपासणीच्या माध्यमातून शहरातील सर्व घटकांची रँडमाईज पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT