संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

धसका कोरोनाचा...दुबईहून आलेल्या सात जणांची घरी जाऊन तपासणी

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद - कोरोनामुळे सर्वत्र काळजी घेण्यात येत असून, दुबईवरून आलेल्या सात जणांची माहिती मिळताच त्यांची आरोग्य विभागाच्या पथकाने घरी जाऊन तपासणी केली. तसेच काही दिवस त्यांच्याशी संपर्क राहील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. 
जिल्ह्यात १७ जण देखरेखीखाली असून, एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. प्रवाशांची ने-आण करणार्‍या एजन्सीकडूनही माहिती घेतली जाईल. मिनी घाटीमध्ये ५२ खाटा तयार असून, विमानतळावर तपासणीसाठी एका खाटेची व्यवस्था केली आहे. शिवाय, महापालिकेला खासगी रुग्णालयांनी ९७ खाटा यासाठी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. 

कुणीही घाबरू नका
अधिक माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, की कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, कोरोना विषाणूबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्तरीय आढावा घेतला असून, त्यांनी सूचित केल्याप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी कोरोना विषाणूबाबत जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रत्येकी एका संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून देखरेखीखाली काही रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आरोग्य यंत्रणांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ५२ खाटा, विमानतळावर एक, तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी दहा, मनपा आणि शहरातील खासगी रुग्णालयात ९७ खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. 

हातरुमालही पुरेसा 
कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्यासाठी त्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांनीच केवळ एन ९५ मास्क वापरण्याची गरज आहे. अन्य व्यक्तींनी केवळ स्वच्छ हातरुमालाचा वापर केला तरी पुरेसे आहे. स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, ‍लिक्विड सोपचा वापर केल्यास सॅनिटायझरची आवश्यकता नाही. या आजारापासून दूर राहण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रवास टाळावा. 

तीन ठिकाणी प्रयोगशाळा 
कोरोना आजाराची तपासणी करण्यासाठी नागपूर, मुंबई आणि पुणे येथे प्रयोगशाळा असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे डॉ. कुलकर्णी, डॉ. कैलास झिने, डॉ. नीता पाडळकर यांनीही यावेळी सांगितले. प्रभारी जिल्हाधिकारी पालवे म्हणाले, की चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांतून १५ फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहेत, त्यांना सक्तीने १४ दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या सात देशांतून आलेल्या व येणार्‍या प्रवाशांचे १०० टक्के क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT