3shaganj 
छत्रपती संभाजीनगर

शहागंजच्या घड्याळाची पुन्हा टिकटिक! दोन आठवड्यांत कामाला सुरुवात

शेखलाल शेख

औरंगाबाद : शहागंज चमन येथील ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. आतापर्यंत याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले. मात्र, आता या घड्याळाच्या दुरुस्तीचे व टॉवरच्या सुशोभीकरणाचे काम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू होणार आहे. साधारणतः दोन आठवड्यांत या कामाची निविदा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


हैदराबाद संस्थानच्या काळात १९३० मध्ये शहागंज चमन येथील या ऐतिहासिक घड्याळाची निर्मिती झाली आहे. तांत्रिक कारणांमुळे मागील काही वर्षांपासून ती बंद पडली. ती आजतागायत दुरुस्त करण्यात आलेली नाही. मध्यंतरी अनेकदा शहरातील काही संस्थांनी, तसेच पालिका प्रशासनाने या घड्याळ दुरुस्ती करण्याच्या हालचाली केल्या; मात्र प्रत्यक्षात काम झाले नाही. दरम्यान, वर्षभरापूर्वी स्मार्ट सिटीतून हे काम करण्याचा निर्णय पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने घेतला आहे. हे काम मार्गी लावण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत घेण्यात आला.

दोन आठवड्यांत निविदा
त्यानुसार आगामी दोन आठवड्यांत या कामाची निविदा प्रसिद्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, याबाबत ऐतिहासिक वास्तूंच्या कामाच्या स्मार्ट सिटीच्या प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले की, इंटेक या कन्सलटंट कंपनीकडून या कामाचा आराखडा तयार केला आहे. लवकरच यासंबंधीची निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याच्या सूत्रांच्या माहितीलाही त्यांनी दुजोरा दिला.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडील गेले, घरची जबाबदारी खांद्यावर आली; दिवसा बांधकामावर मजुरी अन् रात्री अभ्यास, अभिषेक बनला अधिकारी! पण यश बघायला बाप नसल्याने भावूक

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत भयानक पाऊस; २४ तासांत ५० गावांचा संपर्क तुटला

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

SCROLL FOR NEXT