Shiv Sena Kishan Chand Tanwani
Shiv Sena Kishan Chand Tanwani 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी किशनचंद तनवाणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मोठ्या फाटाफुटीनंतर शिंदे गटाच्या गोटात गेलेले आमदार प्रदीप जैस्वाल यांचे महानगरप्रमुख पद काढून त्यांच्या जागी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. आता अडीच महिन्यानंतर श्री. तनवाणी यांना बढती देत त्यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य असे तीन विधानसभा मतदारसंघ हे त्यांचे कार्यक्षेत्र राहणार आहे.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. त्यात औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या ऑगस्टमध्ये प्रदीप जैस्वाल यांचे महानगरप्रमुख पद काढून घेत त्या जागी शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची त्या पदावर नियुक्ती केली होती.

किशनचंद तनवाणी हे २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते, नंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले. मात्र बराच काळ त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते. ते पक्ष कार्यापासून दूरच होते. आमदारांच्या बंडखोरीनंतर त्यांना महानगरप्रमुख पद मिळाले, परंतु त्यानंतरही तनवाणी नाराज असल्याचीच चर्चा होती, आता त्यांना बढती देत जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोनात आई गेली...आता होर्डिंग दुर्घटनेमध्ये २१ वर्षीय कमावता भरत गेला, राठोड कुटुंबावर काळाचा घाला

Marathi News Live Update: ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT