file photo
file photo 
छत्रपती संभाजीनगर

सिद्धी हत्तेकरची वरिष्ठ गटात सुवर्ण कामगिरी

प्रकाश बनकर

औरंगाबाद : डोंबिवली येथे श्रावण स्पोर्टस्‌ ऍकॅडमीतर्फे 19 व 20 जानेवारीदरम्यान झालेल्या 54 व्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत औरंगाबाद येथील "साई'च्या रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या वरिष्ठ गटात त्यांनी स्थान मिळवले. स्पर्धेत सिद्धीने दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कास्य, तर रिद्धीने दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे. 

राज्य जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत

सिद्धी हत्तेकरने बॅलेन्सिंग बीम (10.95 गुण) व फ्लोअर एक्‍सरसाईज (10.70 गुण) या प्रकारात सुवर्ण, अनइवन बार (8.25 गुण) या प्रकारात कास्यपदक तसेच वैयक्तिक सर्वसाधन अजिंक्‍यपद स्पर्धेत (40.85 गुण) उपविजेतेपद पटकावत आपले वर्चस्व वरिष्ठ गटातही सिद्ध केले. तिच्या जुळ्या बहिणीने रिद्धी हिने बॅलेन्सिंग बीम (10.95) व फ्लोअर एक्‍सरसाईज (10.65) या प्रकारात रौप्यपदक पटकावले.

अजय पगारे स्यपदक पटकावले 

वैयक्तिक सर्वसाधन (39.85) अजिंक्‍यपद स्पर्धेत पाचवे स्थान प्राप्त करीत महाराष्ट्राच्या संघात स्थान निश्‍चित केले. तसेच साईच्या अजय पगारे याने कनिष्ठ गटात पॅरलल बार्स या प्रकारात 11.65 गुण घेत कास्यपदक पटकावले. 

त्यांच्या यशाबद्दल भारतीय खेळ प्राधिकरणाच्या उपसंचालक सुषमा ज्योत्सी, उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, क्रीडा उपसंचालक ऊर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, तनुजा गाढवे, संजय गाढवे, राज्य जिम्नॅस्टिक्‍स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी, जिल्हा जिम्नॅस्टिक्‍स संघटनेचे कार्याध्यक्ष संकर्षण जोशी, अध्यक्ष आदित्य जोशी, सचिव हर्षल मोगरे आदींनी अभिनंदन केले. 
हेही वाचा -का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT