Sugarcane Burned In Aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

सहा एकर ऊसासह घराला आग, संसारोपयोगी साहित्य जळुन लाखो रुपयांचे नुकसान

दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कमलाकर रासने

महालगाव (जि.औरंगाबाद ) : महालगाव (ता.वैजापूर) येथे तोडणीस आलेल्या ऊसासह एका आदिवासी कुटुंबाच्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळुन खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज गुरुवारी (ता.सात) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मात्र आगीचे कारण समजु शकले नाही. तलाठी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला व वैजापूर (Vaijapur) नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. यामुळे शेजारी असलेल्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान टळले व कुठली जीवितहानी झाली नाही. (Six Acre Sugarcane Burned In Mahalgaon Of Aurangabad)

यात वाल्मीक विठ्ठल जाधव यांचा एक एकर ऊस (Sugarcane), राजू लक्ष्मण झिंजुर्डे यांचा पाच एकर ऊसासह ठिबक सिंचन, पंडीत सोमनाथ माळी यांच्या राहत्या घराला आग लागुन पाच क्विंटल धान्य, टीव्ही, संसारोपयोगी साहीत्य जळुन खाक झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी सुरुवातीला आग आटोक्यात आणण्यासाठी अंबादास जाधव, उपरपंच प्रकाश आल्हाट, राजु झिंजुर्डे, आकाश झिंजुर्डे, सिद्धार्थ जाधव, रभाजी आल्हाट, अशोक आल्हाट, दीपक जाधव यांनी शर्तीचे प्रयत्न केले. पोलिस पाटील सुधाकर शेळके, तलाठी एस. एस. धनवे, कोतवाल अब्दुल शेख यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. (Aurangabad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: अमृतकुंडातील शिवलिंग 'नव्याने प्रकट' नाही, त्र्यंबकेश्वर देवस्थानने केला खुलासा

'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

Latest Marathi Live Update: सायन पनवेल महामार्गासह प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा

Sangli DCC Bank Recruitment : 444 लिपिक पदांच्या भरतीचा वाद चिघळला! राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात सांगली जिल्हा बँक न्यायालयात, 'सर्किट बेंच'च्या भूमिकेकडे लक्ष

Crime: विवस्त्र अवस्थेत ब्युटी पार्लरमध्ये घुसण्याचा प्रयत्न, महिलेसोबत धक्कादायक कृत्य; बदलापूरमधील घटना

SCROLL FOR NEXT